Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक, प्रताप सरनाईक यांचे आवाहन

प्रत्येक व्यावसायिक चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद सुलभ व्हावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 27, 2026 | 06:49 PM
Traffic Garden, Road Safety, Maharashtra Transport Department, Pratap Sarnaik

Traffic Garden, Road Safety, Maharashtra Transport Department, Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगारनिर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा, यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणे आवश्यक आहे.

Nitesh Rane : नितेश राणेंना मोठा धक्का ; अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी एक महिन्याचा कारावास, मात्र…

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसेच साहित्यिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी, ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि, मराठी भाषा शिकणारच नाही अशी मजुरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. तसेच उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना ‘व्यवहारिक मराठी’ भाषा अवगत असणे अनिवार्य करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Mumbai: राघव चड्ढा यांच्या घराबाहेर ‘आप’ कार्यकर्त्यांचेच जोरदार निदर्शन; ‘गद्दार’च्या घोषणांनंतर 8 जणांवर गुन्हे दाखल

Web Title: Pratap sarnaik practical marathi appeal commercial drivers news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi Language
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
2

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
3

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
4

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.