नेमकं प्रकरण काय ?
नितेश राणे चिखल फेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 2019 मध्ये नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक व मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधीमंडळात जाणार? खासदार संजय राऊतांनी दिलं मिश्किल उत्तर
या प्रकरणातील सुनावणीतून जरी राणेंची सुटका झाली तरी न्यायालयाने कलम 504 अंतर्गत त्यांना शांतता भंग केल्याप्रकरणी तुरुंगवसाची शिक्षा दिली. 504 कलम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व 1 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार अशी माहिती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.
भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ खासदारांना मोठा दिलासा; खासदारकी वाचली; ‘भाजप खासदार’ म्हणून झाली नोंद






