Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच; उत्पादन घटले अन् मागणी वाढली

हापूस आंब्यांसोबतच लालबाग, केशर, बदाम, दशेरी आदी विविध जातींचे आंबेही बाजारात दाखल झाले असून, फळबाजार गजबजलेला दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 11:16 AM
उत्पादन घटले, मागणी वाढली; चाकण बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच

उत्पादन घटले, मागणी वाढली; चाकण बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच

Follow Us
Follow Us:

चाकण / अतिश मेटे : चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रत्नागिरी व देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, उत्पादनात घट होऊनही बाजारभाव तेजीत कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा हापूस आंब्यांचे दर 800 ते 1200 रुपये प्रति डझन दरम्यान स्थिरावले असून, ग्राहकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदीला विशेष महत्त्व असल्याने बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. हापूस आंब्यांसोबतच लालबाग, केशर, बदाम, दशेरी आदी विविध जातींचे आंबेही बाजारात दाखल झाले असून, फळबाजार गजबजलेला दिसत आहे. यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आंबा उत्पादकांसाठी मोठे आव्हान ठरली आहे. फुलोऱ्याच्या काळात अवेळी पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान आणि आर्द्रतेतील बदल यामुळे आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाली, तर काही भागात फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी, दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन लक्षणीयरीत्या घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.

स्थानिक बाजारावर परिणाम

पूर्वी मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होणारा हापूस यंदा विविध कारणांमुळे देशांतर्गत बाजारातच अधिक प्रमाणात विक्रीस येत आहे. काही देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे निर्यात कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठांवर झाला आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढली असली तरी उत्पादन घटल्याने दरांवर फारसा दबाव आलेला नाही.

गुणवत्तेनुसार दरात फरक

व्यापाऱ्यांच्या मते, आंब्याच्या गुणवत्तेनुसार दरात मोठा फरक पडत आहे. आकर्षक रंग, सुगंध आणि चव असलेला देवगड व रत्नागिरी हापूस ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे. दर्जेदार आंब्यासाठी ग्राहक अधिक दर मोजण्यास तयार असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांची भूमिका आंबा व्यापारी शहजाद बागवान यांनी सांगितले की, “यंदा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गुणवत्तेनुसार विक्री होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभाव अधिक असल्याचे दिसून येत आहे.”

आगामी स्थिती काय?

आगामी काही आठवड्यांत आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, उत्पादनाची एकूण स्थिती आणि निर्यातीतील बदल यावरच बाजारभावाचा पुढील कल अवलंबून राहणार आहे. सध्या तरी चाकण बाजार समितीत आंब्यांच्या गोडीने आणि ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ बहरलेली दिसत आहे.

ED on AAP Sanjeev Arora : ED च्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपची चाल? AAP मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर छापा

Web Title: Prices of hapus mangoes remain firm in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Chakan News
  • pune news

संबंधित बातम्या

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
1

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
3

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्य दिवशी नव्हे, तर कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे; रोहीत पवारांचा हल्लाबोल
4

उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्य दिवशी नव्हे, तर कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे; रोहीत पवारांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.