Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती, उद्योगांचे स्थलांतर, रोजगाराचा प्रश्न आणि औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 04:12 PM
चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Follow Us
Follow Us:

चाकण/अतिश मेटे : महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती, उद्योगांचे स्थलांतर, रोजगाराचा प्रश्न आणि औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कारभारावरही गंभीर आरोप केले. उद्योगमंत्री येतील, मोठ्या घोषणा करतील; मात्र जमिनीवरील वास्तव वेगळे आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, कचरा, वीजपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांच्या समस्यांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

३५ हजारांहून अधिक उद्योग बंद अथवा स्थलांतरित झाल्याचा दावा

महाराष्ट्रातील सुमारे ३५ हजार ३०० उद्योग बंद पडले अथवा राज्याबाहेर स्थलांतरित झाले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. उद्योगांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधींवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आणखी सुमारे २० उद्योजक राज्याबाहेर जाण्याचा विचार करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. “उद्योग टिकवणे, नवीन गुंतवणूक आणणे आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र उद्योगांसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारला सवाल

तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरले. राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची गरज असताना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्या तुलनेत कमी असल्याचा दावा करत त्यांनी तरुणांच्या भवितव्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर त्यांनी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित करत उद्योग बंद होणे किंवा स्थलांतरित होणे ही केवळ उद्योजकांची समस्या नसून त्याचा परिणाम हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर होत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

चाकण एमआयडीसीतील रस्ते, कचरा आणि वीजप्रश्न ऐरणीवर

चाकण एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. औद्योगिक परिसरात ठिकठिकाणी कचरा साचणे, रस्त्यांची दुरवस्था आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसह राज्यातील अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्येही अशाच प्रकारच्या समस्या असल्याचा दावा त्यांनी केला. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय आवश्यक असताना प्रत्यक्षात त्याचा अभाव दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रोटोकॉल बाजूला ठेवून एमआयडीसीतील वास्तव पाहावे

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना प्रोटोकॉल बाजूला ठेवून औद्योगिक परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील, तर प्रोटोकॉल आणि सुरक्षेचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे एमआयडीसी परिसरात फिरावे. तेव्हाच प्रत्यक्ष परिस्थिती समोर येईल, असे ठाकरे म्हणाले.

एमआयडीसी, पीएमआरडीएच्या कारभारावर आरोप

एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कारभारावरही ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासनातील विविध कामांसाठी कथितरीत्या दर ठरलेले असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या आरोपांबाबत संबंधित प्रशासन आणि सरकारची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

चाकणसाठी सक्षम अधिकाऱ्याची मागणी

चाकण एमआयडीसीसारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम, कठोर आणि निर्णयक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. “चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमुळे चाकण एमआयडीसीतील उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आरोपांवर उद्योग विभाग, एमआयडीसी आणि संबंधित प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे उद्योग क्षेत्रासह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Aditya thackeray has criticized the government over issues concerning industries in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
4

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.