• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Prithviraj Chavan Exposed Ajit Pawar On The Charges Of Irrigation Scam Nras

ती फाईल माझ्याकडे…’; सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर पृथ्वीराज चव्हाणांनीच केली अजित पवारांची पोलखोल

सांगलीच्या तासगावमध्ये बोलताना अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं. दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 30, 2024 | 12:38 PM
ती फाईल माझ्याकडे…’; सिंचन घोटाळ्याच्या आरोपावर पृथ्वीराज चव्हाणांनीच केली अजित पवारांची पोलखोल

Photo Credit- Team Navrashtra (70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे उमेदवारी संजयकाका पाटील यांची काल प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले. “70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर. आर. पाटील यांनीच माझी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर सही केली होती.” असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या या आरोपांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली सिंचन घोटाळ्याची फाईल माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. मी कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी केली नाही आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अजित पवारांच्या चौकशीचे आदेशही दिले नाहीत. सिंचन घोटाळा हा काही अजित पवारांची पाठ सोडत नाही. पण यासंदर्भात स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे.मी जेव्हा सिंचन घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली होती. पण मी माझ्या काळात 70 हजार कोटींचा घोटाळा असा शब्द वापरला नाही. श्वेत म्हणजे चौकशी नाही, अजित पवारांच्या 2010 -11च्या आर्थिक पाहणी अहवालात गेल्या 10 वर्षांत 70 हजार कोटी रुपये खर्च झाले. सिंचनाची टक्केवारी 18.0 वरून 18.1 अशी झाली, हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालात नमुद करण्यात आले.

हेही वाचा:  Sangali News: आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत अजित पवारांचे गंभीर आरोप

मी नव्याने मुख्यमंत्री झाल्यावर मी जेव्हा ते पाहिलं त्यावेळी मला जरा धक्काच बसला. मी सिंचन खात्याकडे याची शहानिशा कऱण्याचे आदेश दिले. सिंचनाच्या टक्केवारी फार वाढ झालेली नाही. मग वस्तुस्थिती नेमकी काय आहे. याचा अहवाल सादर कऱण्यास सांगितले. चौकशी करायची होती तर ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच दिली असती. पुढे मग त्याची चौकशी झाली, विधीमंडळात चर्चा झाली. त्यानंतर विदर्भ सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी, असा अहवाल खालून आला होता. तो अहवाल तत्कालीन गृहमंत्री आर. आर पाटील यांना सादर कऱण्यात आला. त्यावर अॅंटी करप्शनची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मला असं कळालं की गृहमंत्र्यांनी
त्यांच्या स्तरावरी चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यासंदर्भातील कोणतीही फाईल आलीच नाही. त्या संबधी चौकशी लावण्याचे आदेशही दिले नाही. पण नाहक माझा बळी घेतला, माझं सरकार पाडलं, आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ रोवली.

ती फाईल मी पाहिलीही नाही, गृहंत्र्यांच्या मान्यतेनंतर ती फाईल खाली गेली. अजित पवार बोलले ते खरं असेलही पण त्यात माझा काय दोष? सिंचन घोटाळा असेल, किंवा राज्य सहकारी बँकेचे प्रकरण असेल, त्याची मला शिक्षा भोगावी लागली. पण हा घोटाळा 70 हजार कोटींचा होता की 40 हजार कोटींचा होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच माहित, ते भोपाळमध्ये बोलले, ते पाहिलं तर दुसरं कुणी शिक्कामोर्तब करायची गरजच नाही.

हेही वाचा:  Assembly Ratnagiri: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; परशुराम कदम यांचा शिंदे गटात प्रवेश

काय म्हणाले होते अजित पवार?

सांगलीच्या तासगावमध्ये बोलताना अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं. दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे फाईल गेली. त्यावेळी आर. आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करण्याचे आदेश देत फाईल सही केली. पण त्यानंतर सरकार गेलं, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण राज्यपालांनी माझ्या त्या फाईलवर सही केली नाही. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर कारवाई करण्यासाठी फाईलवर सही केली.

Web Title: Prithviraj chavan exposed ajit pawar on the charges of irrigation scam nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?
1

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर…; काँग्रेसचे आव्हान
2

भाजप अन् राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? हिम्मत असेल तर…; काँग्रेसचे आव्हान

Ajit Pawar Menifesto for Pune: मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन; पुणेकरांना अजित पवारांचा मास्टरप्लॅन प्लॅन
3

Ajit Pawar Menifesto for Pune: मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन; पुणेकरांना अजित पवारांचा मास्टरप्लॅन प्लॅन

70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले
4

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते? उडवण्यामागे काय आहे कारण शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला पतंग का उडविले जाते? उडवण्यामागे काय आहे कारण शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण

Jan 12, 2026 | 01:08 PM
Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

Jan 12, 2026 | 01:07 PM
Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Jan 12, 2026 | 01:05 PM
The Raja Saab Box Office: प्रभासच्या ‘द राजा साब’ने केली कल्ला, अवघ्या तीन दिवसात मोडले ५ चित्रपटांचे रेकॉर्ड

The Raja Saab Box Office: प्रभासच्या ‘द राजा साब’ने केली कल्ला, अवघ्या तीन दिवसात मोडले ५ चित्रपटांचे रेकॉर्ड

Jan 12, 2026 | 01:03 PM
SEBI NSE IPO Approval: सेबी लवकरच देऊ शकते एनएसई आयपीओसाठी NOC; गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला 

SEBI NSE IPO Approval: सेबी लवकरच देऊ शकते एनएसई आयपीओसाठी NOC; गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला 

Jan 12, 2026 | 12:57 PM
Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण?

Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण?

Jan 12, 2026 | 12:49 PM
Iran Protests: ‘त्यांनी स्वतः फोन केला!’ Donald Trump यांचा एअर फोर्स वनवरून इराणबद्दल मोठा गौप्यस्फोट; खामेनेईंचा ‘असा’ प्रस्ताव

Iran Protests: ‘त्यांनी स्वतः फोन केला!’ Donald Trump यांचा एअर फोर्स वनवरून इराणबद्दल मोठा गौप्यस्फोट; खामेनेईंचा ‘असा’ प्रस्ताव

Jan 12, 2026 | 12:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

Jan 11, 2026 | 11:32 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.