Special Cleanliness Drive in Pandharpur Ahead of Kartiki Purnima ( कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विशेष स्वच्छता मोहीम )
या मोहिमेअंतर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासह मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच परिसरात स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाविकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून देणे आणि धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केवळ स्वच्छता करण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून, या काळात स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. यासाठी सुमीत ग्रुपचे विशेष पथक भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमीत साळुंखे म्हणाले, “पंढरपूर हे आमच्या मनात विशेष स्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र नगरीच्या स्वच्छतेसाठी योगदान देणे, हा सुमीत ग्रुपमधील आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे.”
दरम्यान, सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस ही भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये कंपनीचे कामकाज सुरू आहे. कंपनीमध्ये ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेतून धार्मिक स्थळांची स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येत आहे.






