Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन जुलैमध्ये टोमॅटोला उन्हाचा तडाखा; मालाची आवकही घटली

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊन-पावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2024 | 08:40 AM
Tomato

Tomato

Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची प्रतिक्षा असताना काही ठिकाणी उन्हाचा तडाखा बसला आहे. आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने टोमॅटोची स्थानिक पातळीवरील आवक घटली आहे. याचा परिणाम मुंबईला रोज पाठविल्या जाणाऱ्या मालावर झाला आहे.

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊन-पावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे. यामुळे बाजारातील दर किलोला शंभरच्या आसपास आहेत. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या वर राहिल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा मोठा फटका बसला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 ते 15 हजार जाळ्यांची (एक जाळी 20 किलो) आवक होत असते. सध्या हे प्रमाण तीन हजार जाळ्यांवर आले आहे. घाऊक बाजारात क्विंटलला सरासरी चार हजार रुपये दर आहे. पावसामुळे मालाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील आवक कमी झाल्याने काही व्यापारी संगमनेर परिसरातून किरकोळ विक्रीसाठी माल आणत आहेत.

नाशिकमध्ये आवक कमी

नाशिकच्या बाजार समितीत सध्या टोमॅटोची 80 टक्के आवक कमी झाल्याचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. अवकाळी फटका तर कधी गारपिटीची आपत्ती यामुळे शेती व्यवसायाचे सगळे गणितच सध्या बिघडले आहे.

उत्पादन 100 कॅरेटने घटले

यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊनपावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. अशा रोपांना नेहमीच्या प्रमाणात फळे कमी लागतात. याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.

Web Title: Production of tomato is now reduced due to climate change nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 08:40 AM

Topics:  

  • Climate Change
  • Tomato Market
  • weather news

संबंधित बातम्या

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
1

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…
2

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…

मोठी बातमी ! राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत
3

मोठी बातमी ! राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी
4

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.