भरतगाव : महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम बंद करताना ग्रामस्थ
भरतगाव व भरतगाववाडी ही गावे महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहेत. कमी उंचीच्या पुलामुळे येथील ग्रामस्थ, प्रवाशांना वेळोवेळी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे लोकांना ये- जा करणे जिकिरीचे ठरते. याबाबत ग्रामस्थ, दोन्ही ग्रामपंचायतीनी संबंधित अधिकाऱ्यांना गैरसोयीची माहिती दिली होती. पाठपुरावाही केला होता.
Satara News: इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा कडक इशारा
तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुखांना निवेदनही दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेत सहापदरीकरणाचे काम बंद पाडले. या वेळी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापकही उपस्थित होते.
येत्या दिवसांत पुलाची उंची व रुंदीकरण न झाल्यास दोन्ही गावांतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीनी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.






