Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या १२ दिवसांच्या काळात पुण्यातील मुख्य मध्यवर्ती भाग आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 14, 2026 | 09:33 AM
Pune Ganeshotsav 2026 Security, Pune Police, Security Plan

Pune Ganeshotsav 2026 Security, Pune Police, Security Plan

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात शहरातील मानाचे आणि प्रमुख गणेश मंडळ परिसरात मोठा फौजफाटा तैनात
  • गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी, मोबाईल किंवा सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर गुन्हे शाखेकडून लक्ष
  • गर्दीच्या ठिकाणी महिला आणि तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी विशेष छेडछाडविरोधी पथके सक्रिय
Pune Ganeshotsav 2026: पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला सुरुवात आजपासून होत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या कालावधीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल सव्वा सात हजार पोलिस अधिकारी आणि अंमलदार शहराच्या रस्त्यावर तैनात राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

गर्दीचा फायदा घेणाऱ्यांवर असेल वॉच

गणेशोत्सवात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेकडून साध्या वेशातील पथके तैनात करण्यात येणार असून, गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट व मौल्यवान वस्तूंच्या चौऱ्या करणाऱ्या सराईतांवर त्यांची करडी नजर राहणार आहे. महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाडविरोधी पथकेही सक्रिय राहणार आहेत. गर्दीमध्ये महिलांची छेडछाड, गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबर संवेदनशील ठिकाणी क्यूआरटी आणि एसआरपीएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

Sharad Pawar : शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; शेतकऱ्यांच्या थकीत पैशांसाठी पाठपुरावा

गणेशोत्सवासाठी पोलिसांचा फौजफाटा

वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अंमलदारांपर्यंत मोठी यंत्रणा
अप्पर पोलिस आयुक्त : ४
पोलिस उपायुक्त: १४
सहाय्यक पोलिस आयुक्त : ३०
पोलिस निरीक्षक २१५
पोलिस उपनिरीक्षक : ७००
पोलिस अंमलदार: ७ हजार २००
होमगार्ड : १ हजार १००
क्यूआरटी व एसआरपीएफची पथकेही तैनात-

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

गर्दीच्या ठिकाणी, मुख्य मिरवणूक मार्गांवर आणि प्रमुख गणपती मंडळांच्या परिसरात महिलांशी गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ कडक कारवाई केली जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षेचा अतिरिक्त स्तर म्हणून शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक मार्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले असून, संपूर्ण शहरावर शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे

पुणे पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिक, भाविक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Pune ganeshotsav starts today over 7000 police personnel deployed for security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • police security
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल
1

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
2

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा
3

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
4

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.