Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानंतर श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2026 | 04:22 PM
Sunetra Pawar calls Sharad Pawar Pune election

Sunetra Pawar calls Sharad Pawar Pune election

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे
  • सुनेत्रा पवार यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन
  • विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न सुरू
Vidhan Parishad Election 2026: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याशी फोनवरून संपर्क साधत पुण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे विधान परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा कडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कांद्याबाबत केंद्र, राज्य सरकार सकारात्मक; वळसे पाटलांनी आंदोलकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

मात्र, निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांतर्गत सुनेत्रा पवार यांनी थेट शरद पवार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानंतर श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, काकडे यांनीदेखील शरद पवार यांच्याशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची विनंती केली होती. अखेर दोन्ही बाजूंच्या चर्चांना यश आल्याने पुण्यातील निवडणुकीची रंगत संपुष्टात आली असून विक्रम काकडे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये समन्वय आणि राजकीय तडजोडींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

Web Title: Pune mlc election unopposed sunetra pawars direct call to sharad pawar seals the deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • pune news
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
4

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.