Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त

Pune Mumbai expressway Traffic : पुणे मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या तब्बल ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 04:04 PM
Pune Mumbai Expressway Traffic Jam marathi news update lonavala 5-Kilometer Queues of Vehicles

Pune Mumbai Expressway Traffic Jam marathi news update lonavala 5-Kilometer Queues of Vehicles

Follow Us
Follow Us:
  • पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
  • लोणावळा घाट परिसरामध्ये वाहनांच्या रांगा
  • राम नवमी दिनी पुणे मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी
 

Pune Mumbai expressway Traffic : लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा वाहतूक कोंडीमध्ये अडकला आहे. यापूर्वी दोन दिवस झालेल्या वाहतूक कोंडीनंतर आज पुन्हा एकदा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या तब्बल ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. (Maval News)

राम नवमीच्या दिवशी पुणे मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात येत असला तरी मोठ्या प्रमाणात अडकलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे.

हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यामध्ये घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे स्पष्ट दिसते. अनेक वाहनचालक गाड्यांमधून उतरून रस्त्यावर उभे राहत वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहताना दिसत आहेत.

रामनवमीच्या सुट्टीमुळे महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ही कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून काहींनी सोशल मीडियावर खोचक प्रतिक्रिया देताना “मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा ‘संथ मार्ग’ म्हणून उल्लेख करावा,” अशी टिप्पणी केली आहे. काही प्रवाशांनी दररोज २५ ते ४५ मिनिटांचा उशीर होत असल्याचेही नमूद केले आहे.

हे देखील वाचा : मावळात APMCच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दणका! बहुमत असूनही भाजपचे सुभाषराव जाधव सभापती

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा देशातील अत्यंत व्यस्त मार्गांपैकी एक आहे. विशेषतः घाट परिसरातील भौगोलिक परिस्थितीमुळे येथे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होते. याशिवाय एखादे वाहन बंद पडणे किंवा अपघात झाल्यास परिस्थिती अधिकच गंभीर बनते. दरम्यान, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Web Title: Pune mumbai expressway traffic jam marathi news update lonavala 5 kilometer queues of vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Lonavala news
  • maval news
  • Pune Mumbai
  • Pune-Mumbai expressway

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.