Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध

पाटील यांचे कुणबी (इतर मागास वर्ग) या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानंतर संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 04:24 PM
Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध
Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून कुणबी दाखला अवैध
  • पाटील यांची याचिका फेटाळली आणि पडताळणी समितीचा निर्णय कायम
  • मुख्याधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून सदस्यत्व रद्दचे आदेश जारी
Patas News: दौंड नगरपरिषदेचे नागरीक हित संरक्षण मंडळाचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी (दि. ४) दौंड नगरपरिषद आणि रोहित पाटील यांना दिले. त्यामुळे दौंड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ ‘अ’मधील मागास प्रवर्गासाठी राखीव असलेली जागा रिक्त झाली असून या जागेवर पोट निवडणुकीकडे लक्ष्य लागले आहे.

दौंड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ४ ‘अ’मधून मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरून नागरिक हित संरक्षण मंडळा चे पुरस्कृत उमेदवार होते ते या प्रभागात निवडून आले होते. निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी अवैध ठरविले होते. त्यावर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळली.

कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो : डॉ. विश्वजीत कदम

पाटील यांचे कुणबी (इतर मागास वर्ग) या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानंतर संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला होता.

संबंधित जागा रिक्त झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या आदेशाद्वारे रोहित राजेश पाटील यांचे दौंड नगरपरिषदेतील नगरसेवकपद रद्द केले असून, प्रभाग क्रमांक ४ ‘अ’मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेली जागा रिक्त झाल्याचे घोषित केले आहे. या निर्णयामुळे दौंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता या रिक्त जागेबाबत पुढील निवडणूक प्रक्रिया कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या निर्णयाविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी

Web Title: Pune news daund corporator rohit patil disqualified caste certificate invalid collector jitendra dudi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Daund News
  • Maharashtra Politics
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Baramati Politics: विकासाला विरोध नाही, शेती वाचवा; मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर बारामतीत वाद
1

Baramati Politics: विकासाला विरोध नाही, शेती वाचवा; मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर बारामतीत वाद

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!
2

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष
3

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
4

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.