Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune 23 Villages Development Plan: २३ गावांचा विकास आराखडा आता पुणे महापालिका तयार करणार; ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार?

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहर सुधारणा समितीसमोर या २३ गावांच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 12:23 PM
Pune 23 Villages Development Plan, PMC New DP Proposal,

Pune 23 Villages Development Plan, PMC New DP Proposal,

Follow Us
Follow Us:
  • २३ गावांच्या विकास आराखड्याचा (DP) प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीसमोर सादर
  • पीएमआरडीएने (PMRDA) तयार केलेला प्रारूप आराखडा तांत्रिक त्रुटींमुळे २७ सप्टेंबर २०२५ रोजी रद्द
  • राज्य सरकारने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करून सर्व अधिकार पुणे महापालिकेकडे
Pune 23 Villages Development Plan: महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या संदर्भातील विकास आराखड्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला आहे. यामुळे मागील पाच वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांच्या विकासाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी या भागाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होती. मात्र, पीएमआरडीएने तयार केलेला प्रारूप आराखडा वाढत्या हरकती आणि तांत्रिक त्रुटींमुळे २७ सप्टेंबर २०२५ रोजी रद्द करण्यात आला. त्यामुळे सध्या या भागात १९९७ चा प्रादेशिक आराखडा लागू आहे.

Pune Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

नियोजनबद्ध विकासाची गरज अधोरेखित

२३ गावांचा महापालिका हद्दीत समावेश होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत नागरीकरण आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, रस्ते, पायाभूत सुविधा, आरक्षणे आणि सार्वजनिक सेवांचे योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जुन्या शहराच्या रचनेशी सुसंगत असा एकात्मिक विकास करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

समितीच्या मान्यतेनंतर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार

दरम्यान, महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करून सर्व नियोजन अधिकार महानगरपालिकेकडे सुपूर्द केले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहर सुधारणा समितीसमोर या २३ गावांच्या विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल.

विकास आराखड्यात समाविष्ट गावे

म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली. या आराखड्‌यामुळे या गावांमध्ये नियोजनबद्ध पायाभूत सुविधा, रस्ते, सार्वजनिक सेवा आणि शाश्वत नागरी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Pune news pmc moves proposal for development plan of 23 merged villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Development Plan
  • PMRDA

संबंधित बातम्या

प्रशासकीय कामांसाठी ‘पीएमआरडीए’ची ‘त्रिसूत्री’; पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी अन् पारदर्शकतेवर भर
1

प्रशासकीय कामांसाठी ‘पीएमआरडीए’ची ‘त्रिसूत्री’; पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी अन् पारदर्शकतेवर भर

PMRDA गृहयोजनेतील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची चांदी! ३३० जणांना सदनिकांची लॉटरी; १८ जूनपर्यंत मुदत
2

PMRDA गृहयोजनेतील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची चांदी! ३३० जणांना सदनिकांची लॉटरी; १८ जूनपर्यंत मुदत

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
3

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!
4

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.