पुणेकरांनो पाणी जपून वापरा! १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा
Pune Water Supply: पुणेकरांनो आता पाणी जपून वापरा, १५ जुनपासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खडकवासला धरणसाखळीत उपलब्ध असलेला मर्यादित जलसाठा आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा देशातील हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 60 टक्के असल्याने प्रशासनाने आतापासूनच पाणी व्यवस्थापनावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
सध्या खडकवासला धरणसाखळीत केवळ 5.03 टीएमसी पाणी शिल्लक असून त्यापैकी पुणे शहरासाठी सुमारे 3 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. हा साठा तुलनेने कमी असल्याने जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील विविध भागांना नव्या वेळापत्रकानुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
खाजगी सोसायट्यानी एसटीपी बांधण्यात आला आहे त्या एसटीपी कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे.
बंद एसटीपी सुरु करून त्या पाण्याचा पुनर्वापर गार्डनिंग व
फ्लशिंगकरिता करणेत यावा
आंघोळ, भांडी धुणे व कपडे धुणे यासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा.
सार्वजनिक हॉटेल्स तसेच रेस्टोरेंट, खाजगी कॉलेजचे होस्टेल इमारती यांच्या व्यवस्थापकांनी पिण्याच्या पाण्याची सर्व प्रकारे बचत करावी.
पाणी साठवताना आवश्यक तेवढेच पाणी साठवावे व अनावश्यक साठवणूक टाळावी.
याठिकाणी करा तक्रार
पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पीएमसी केअर हेल्पलाईन 1800-1030-222, व्हॉट्सअॅप क्रमांक 9689900002 किंवा पीएमसी केअर अॅपवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.
बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापर करू नये
बांधकामासाठी एसटीपीचे पाणी वापरावे
घरातील सर्व नळ तसेच, सार्वजनिक स्वच्छतागृहे येथील नळ कनेक्शन, फलश टाक्या च पाईपलाईनमधील गळती तात्काळ तपासून ती दुरुस्त करावी.
सर्व इमारतीमधील नळजोड/वॉशरूम फ्लश टैंक तपासून गळती बंद करावी.
सार्वजनिक तसेच, खाजगी वॉशिंग सेन्टर्स बंद करणेत यावेत.
वाहन धुणे, अंगण किवा पदपथ
स्वच्छ करणे यासाठी बोरिंग अथवा पुणे महापालिकेच्या पाण्याचा वापर करू नये.






