Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य निदर्शने रोखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 01:08 PM
Amit Shah Pune Visit August 1 2026, NSA Ajit Doval Lokmanya Tilak Award,

Amit Shah Pune Visit August 1 2026, NSA Ajit Doval Lokmanya Tilak Award,

Follow Us
Follow Us:
  • अमित शहा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
  • पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच शहरातील विविध भागांत कारवाई
  • भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर जमल्याने शहरात राजकीय वातावरण तापले
 

Amit Shah in Pune Visit: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अजित डोवाल हेदेखील आले आहेत. अमित शहा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी अनेक काँग्रेस आणि युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. काँग्रेस कार्यकर्ते राहुल शिरसाट यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. तसेच येरवडा परिसरासह शहरातील इतर भागांतूनही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी युवक काँग्रेसचे अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे यांनाही प्रतिबंधात्मक कारवाईत ताब्यात घेतले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर संभाव्य निदर्शने रोखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांच्या दौऱ्याविरोधात आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. सकाळपासून उत्सव हॉटेल चौक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमली आहे.

दुसरीकडे, भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर जमल्याने शहरात राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांकडूनही निदर्शनांचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. अमित शाह यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा पुण्यातील कटारिया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व ठेवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert: सावधान! राज्यावर ढगांची दाटी; पुण्यात दाणादाण अन् भिडे पूल पाण्याखाली, कोकणात…

प्रवेशद्वारावर प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असून, डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरातील संवेदनशील ठिकाणीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या आंदोलनामुळे आणि भाजपच्या शक्तिप्रदर्शनामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Web Title: Pune news union home minister amit shah pune visit lokmanya tilak award congress protest detain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Ajit Doval news
  • Amit Shah
  • BJP Politics
  • Pune Politics

संबंधित बातम्या

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
1

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज
2

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला
3

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
4

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.