Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amol Balwadkar News: माझ्याशी मतभेद असतील तर राजकीय पातळीवर लढा, जनतेची कामे का रोखता?; अमोल बालवडकरांचा संताप

महानगरपालिकेचा विकास निधी हा कोणत्याही व्यक्तीचा नसून नागरिकांच्या करातून त्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध होणारा निधी आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील रद्द करण्यात आलेल्या विकासकामांच्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व नियोजित विकासकामे पूर्ववत सुरु करण्यात यावीत,

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 10:58 AM
Pune News : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; उपस्थित केला कायदेशीर मुद्दा

Pune News : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; उपस्थित केला कायदेशीर मुद्दा

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत फेरविचार प्रस्ताव आणून प्रभाग ९ मधील विकासकामांचा निधी रद्द.
  • रस्ते, ड्रेनेज लाईन, उद्याने व नागरी सुविधांच्या प्रस्तावित प्रकल्पांचे काम रखडणार.
  • चंद्रकांत पाटील यांच्या दबावातून निधी रद्द केल्याचा अमोल बालवडकरांचा थेट दावा.
PMC Ward 9 Development Fund Cancelled : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी प्रस्तावित विविध विकासकामांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून रद्द करण्यात आला असून, हा निर्णय राजकीय वैमनस्यातून घेण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. Pune news

प्रभाग क्रमांक ९ मधील रस्ते, ड्रेनेज, उ‌द्याने तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय हस्तक्षेपातून महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या विषयाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत आणण्यात आला आणि अखेर संबंधित विकासकामांचा निधी रद्द करण्यात आल्याचा आरोप बालवडकर यांनी केला.

Pune Ganeshotsav: ‘रूप पाहता लोचनी’! ‘वृक्ष गणपती’ ते…’; पुण्याच्या बाजारात अवतरली बाप्पाची विविध मनमोहक रूपे

यापूर्वी प्रभागातील विकासकामे आणि निधीतील कामांचे स्पेशल ऑडिट’ करण्याचा विषय पुढे आणण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष विकासकामांचा निधीच रद्द करण्यात आल्यामुळे हा प्रकार केवळ अमोल बालवडकर यांच्या विरोधातील राजकीय भूमिका नसून प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासावर परिणाम करणारा निर्णय आहे, असे बालवडकर यांनी म्हटले आहे.

“राजकीय मतभेद माझ्याशी असतील तर राजकीय पातळीवर लढा. मात्र त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेच्या हक्काची विकासकामे रोखणे योग्य नाही. रस्ते, ड्रेनेज, उ‌द्याने आणि मूलभूत सुविधा ही माझी वैयक्तिक कामे नसून नागरिकांची गरज आणि त्यांचा हक्क आहे,” असे अमोल बालवडकर म्हणाले.

निधी रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक नियोजित विकासकामांना खीळ बसणार असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“स्वतः काम करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काम करू द्यायचे नाही, अशी ‘ना काम करूंगा, ना करने दूंगा’ भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. राजकीय वैमनस्यातून जनतेच्या विकासकामांमध्ये अडथळे आणणे हे कोथरूडच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, अशी टीका अमोल बालवडकर यांनी केली.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

मात्र, अशा राजकीय अडथळ्यांमुळे प्रभागाच्या विकासाची गती थांबणार नाही, असे स्पष्ट करत बालवडकर म्हणाले, “स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत काम करण्याचा विचार दिला. त्यांचा हाच विकासाचा विचार पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ९ आणि परिसरातील विकासकामे यापुढेही अधिक जोमाने आणि ताकदीने सुरु ठेवणार आहोत. राजकीय अडथळे कितीही आले तरी जनतेच्या विकासासाठी आमचे काम थांबणार नाही.”

महानगरपालिकेचा विकास निधी हा कोणत्याही व्यक्तीचा नसून नागरिकांच्या करातून त्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध होणारा निधी आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील रद्द करण्यात आलेल्या विकासकामांच्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व नियोजित विकासकामे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.

“राजकीय संघर्ष जरूर करा; पण त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ आणि कोथरूडच्या नागरिकांचा विकास वेठीस धरु नका,” असे आवाहनही त्यांनी केले.

 

Web Title: Pune newskothrud ward 9 development fund cancelled amol balwadkar allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • chandrakant patil
  • Pune Municipal Corporation
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
1

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
2

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
3

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
4

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.