Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Pune Draft Electoral Roll Update: जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयांत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2026 | 10:59 AM
Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर २०२६ अर्हता दिनांकावर आधारित २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध
  • जिल्ह्यातील ९०.८० लाख मतदारांपैकी तब्बल २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली
  • १७.८३ लाख मतदार पत्त्यावर गैरहजर, ५.९१ लाख स्थलांतरित तर ३.१२ लाख मतदार मृत आढळले
Pune Draft Electoral Roll Update October 2026: भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत विविध कारणांमुळे तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत.

पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. त्यापैकी ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांनी गणना पत्रक भरून दिले आहे. पुनरीक्षणादरम्यान १७ लाख ८३ हजार ५८ मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नाहीत. ५ लाख ९१ हजार ३८ मतदारांचे स्थलांतर झाल्याचे निदर्शनास आले, तर ३ लाख १२ हजार ४८ मतदार मृत असल्याचे आढळले. याशिवाय १ लाख ४३ हजार ९७५ नावे दुबार आणि ३६ हजार ३६२ नावे इतर कारणांमुळे वगळण्यात आली आहेत.

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

वगळण्यात आलेल्या मतदारांना आवश्यक पुरावे सादर करून नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. विशेषतः सन २००२ च्या मतदार यादीत स्वतःचे अथवा आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव असल्याचा पुरावा असलेल्या मतदारांना नमुना क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय किंवा अन्य तपशीलात बदल अथवा दुरुस्ती करायची असल्यास आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्रमांक ८ भरता येईल. तसेच एखाद्या मतदाराच्या नावाबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ द्वारे हरकत नोंदविता येणार आहे. प्रारूप यादीतील काही मतदारांच्या तपशिलात तफावत आढळली असून, काहींचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग झालेले नाही. अशा ‘अॅनॉमलीज’ आणि ‘नो लिंकेज’ प्रकरणांवर संबंधित यादीभागाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी होणार आहे.

“विशेष सखोल पुनरीक्षणानंतर पुणे जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्या मतदारांचे नाव वगळले गेले आहे अथवा तपशीलात त्रुटी आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित अधिकान्यांकडे दावा किंवा हरकत दाखल करावी.
– मीनल कळसकर, जिल्हा निवडणूक अधिकारी

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

४ नोव्हेंबर रोजी अंतिम यादी; अपिल करता येणार

सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम यादीत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. दावे हरकतीवर मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या स्तरावर सुनावणी होणार असून, ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, संबंधित अधिकान्यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे अपील करता येईल.

जिल्ह्यातील यादी संकेतस्थळावर पाहता येणार

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयांत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in सकेतस्थळावर, भारत निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूय यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किवा हरकत दाखल करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

पात्र नावे वगळले जाण्याची शक्यता : खा. सुळे

राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन (एस. आय. आर) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपले तसेच कुटुंबातील सदस्यांचे ए. एस. डी. डी यादीत आहे किंवा नाही, याची तातडीने तपासणी करावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील २,५१५ मतदान केंद्रांवरील तब्बल २५ लाख ९६ हजार २५३ मतदारांच्या मतदार यादीची एस आय. आर प्रक्रियेंतर्गत तपासणी सुरू आहे.

या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्यायादीत चार प्रकारच्या मतदारांचा समावेश आहे. शोधूनही न सापडलेले किंवा संपर्क न झालेला मतदार, अन्यत्र स्थलांतरित झालेला मतदार, मृत मतदार आणि एकापेक्षा अधिक वेळा मतदार यादीत नोंद असलेला दुबार मतदार. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही ए. एस. डी. डी चा अर्थ अबसेन्ट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट असा दिला आहे. हेल्पलाइन क्रमांक १९५०ची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: Pune newspune draft electoral roll 2026 over 28 lakh voter names deleted check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Election Commission
  • Pune
  • pune news
  • Voter List

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
1

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
2

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
3

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
4

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.