Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर

गायरान जमिनी पीएमआरडीएकडे गेल्यास ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध राहणार नाही. खेळाची मैदाने, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी, रस्ते, नाले आणि सभामंडप यांसारख्या विकासकामांवर परिणाम होईल.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2026 | 05:15 PM
Pune PMRDA Gairan land transfer controversy

Pune PMRDA Gairan land transfer controversy

Follow Us
Follow Us:
  • गायरान जमिनी या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) वर्ग करू नयेत
  • णे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ६०६ ग्रामपंचायती आणि ६७४ गावे सध्या पीएमआरडीएच्या हद्दीत
Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनी या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) वर्ग करू नयेत आणि त्या ग्रामपंचायतींकडेच कायम ठेवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. यासाठी जगदाळे यांनी बुधवारी मुंबईत जाऊन पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील उपस्थित होते

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ६०६ ग्रामपंचायती आणि ६७४ गावे सध्या पीएमआरडीएच्या हद्दीत येतात. हवेली, मुळशी, मावळ, भोर, खेड, दौंड, शिरूर, पुरंदर आणि वेल्हे तालुक्यांतील या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गायरान जमिनी पीएमआरडीएकडे वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेची दखल घेत जगदाळे यांनी तातडीने राज्य सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.

वाढदिवसावर खर्च न करता एक लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत; भाजप नगरसेवकाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नगरविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सुमारे २ हजार ९४.३९ हेक्टर गायरान जमीन विनामूल्य पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये हवेली, मुळशी, दौंड, भोर, मावळ, पुरंदर, शिरूर आणि खेड तालुक्यांतील गायरान क्षेत्रांचा समावेश आहे.

जगदाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व वन विभागाच्या १२ जुलै २०११ च्या धोरणानुसार गायरान जमिनीचे इतर प्रयोजनासाठी हस्तांतरण करण्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव, जिल्हा परिषदेची शिफारस आणि पर्यायी शासकीय जमीन उपलब्ध नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच गावातील गायरान क्षेत्र हे एकूण शेतीक्षेत्राच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. याशिवाय २६ मार्च १९८४ च्या शासन निर्णयासह सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांनुसार गायरान जमिनींचे संरक्षण अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नारळाचे झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, दोन महिला जखमी

गायरान जमिनी पीएमआरडीएकडे गेल्यास ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध राहणार नाही. खेळाची मैदाने, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी, रस्ते, नाले आणि सभामंडप यांसारख्या विकासकामांवर परिणाम होईल. तसेच पशुपालकांना चराई क्षेत्राची कमतरता भासून ग्रामीण विकासात असमतोल निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे.

जगदाळे यांच्या प्रमुख मागण्या

गायरान जमिनी पीएमआरडीएकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचा तात्काळ पुनर्विचार करावा.

ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनी त्यांच्या अखत्यारीतच कायम ठेवाव्यात.

हस्तांतरणाच्या यादीतून गायरान व सार्वजनिक वापरातील जमिनी वगळाव्यात.

आवश्यक असल्यास समतुल्य पर्यायी सरकारी जमीन ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावी.

कोणतेही हस्तांतरण करण्यापूर्वी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामस्थांची सहमती घेण्याची तरतूद करावी.

 

 

 

Web Title: Pune pmrda gairan land transfer controversy pmrda boundary villages haveli mulshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • PMRDA
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.