वाढदिवसावर खर्च न करता एक लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत; भाजप नगरसेवकाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : भाजपचे पुणे सरचिटणीस आणि नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत, परकीय चलन बचत व स्वदेशीला प्राधान्य देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी फलक न लावण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. वाढदिवसाचा खर्च टाळून साळेगावकर यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश बगाडे, हेमंत डाबी, सौरभ कुंडलिक, मंगेश रंगे हे उपस्थित होते. रविंद्र साळेगावकर हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यांची पक्षाने स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. साळेगावकर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील शिवाजीनगर भागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.
रविंद्र साळेगावकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत शिवाजीनगर भागातील जवळपास १४० सोसायट्यांच्या टाक्यांची स्वच्छता केली आली आहे. स्वच्छतेदरम्यान टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती, शेवाळे काढून संपूर्ण टाकी स्वच्छ केली जाते. त्यानंतर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते.
बापरे! तब्बल 1413 कोटींची संपत्ती ! DK Shivakumar देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; तर सर्वात कमी संपत्ती कोणत्या CM कडे?
साळेगावकर यांनी मोफत सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह परिसरातील अनेक सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बंगल्यांतील टाक्यांची स्वच्छता केली आली आहे.
भाजपमधील 32 वर्षांच्या प्रवासाचे सांगितले किस्से
गेल्या काही दिवसांखाली रविंद्र साळेगावकर यांनी नवराष्ट्रला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नागरिकांचे प्रश्न, मतदारसंघाचं व्हिजन यासह अनेक मुद्द्यांवर संवाद साधला होता. तसेच भाजपमध्ये 32 वर्ष सक्रिय प्रवासातील अनेक किस्सेही सांगितले होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले होते.
MLC Election : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांसमोर बंडखोरांचेच आव्हान; अंतर्गत वादामुळे वाढली धुसफूस






