पुणे : कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातातप्रकरण देशभर चर्चेत आहे. पोलिसांवर टिका सुरू झाल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात दाखल होत, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन याबाबत माध्यमांना माहिती दिली होती. दरम्यान हे प्रकरण दररोज वेगळे वळण घेत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दररोज याघटनेची माहिती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे.
आलीशान कारचा अपघात
कल्याणीनगर भागात गर्भश्रीमंत घरातील अल्पवयीन मुलाने आलीशान कारने आयटी इंजिनिअर तरुणी व तरुणीचा जीव घेतला. त्याला आता दहा दिवस झोले आहेत. मात्र हे प्रकरण दररोज वेगळे वळण घेत आहे.
गुन्हा दाखल होण्यास झालेला उशीर, स्थानिक पोलीस ठाण्यात आमदारांची उपस्थिती आणि पिझा पार्टी यामुळे पुणे पोलिसांवर संशय निर्माण झाला. तर, यासर्व प्रकारामुळे नागरिकांकडून टीका देखील केली जात आहे. त्यानंतर याप्रकरणात मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षाने आरोप सुरू केले.
तर नागरिकांनी पब व हॉटेल यांचा रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या गोष्टींवरून पुणे पोलिसांना टार्गेट केले. एकूणच याप्रकरणी गोंधळ उडल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, यात कोणालाही सोडले जाणार नाही असेही स्पष्ट केले.
त्यामुळे फडणवीस यांनी या गुन्ह्यात स्वतः लक्ष घातले आहे. दररोज पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याची माहिती ते घेत आहेत.
याप्रकरणात आतापर्यंत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून यामध्ये अल्पवयीन मुलगा, बिल्डर विशाल अगरवाल, त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला मद्य पुरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.
पोलीस निरीक्षकला निलंबीत
तर कन्ट्रोल रूमला लवकरात लवकर माहिती न दिल्यामुळे येरवडा पोलिस ठाण्याचा प्रभारी कार्यभार असलेल्या गुन्हे निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षकला निलंबीत करण्यात आले आहे. त्यानंतर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुण्यातच बदल झाला असल्यसचा धक्कादायक प्रकार समोर आला.
लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार
त्यात ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अमित घटकांबळे यांना अटक झाली आहे. त्यांनी लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहार झाला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. यामध्ये ससून रूग्णालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात राज्य शासनाने आता समीती गठीत केली आहे. समीतीकडून
याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणाच्या तपासात त्रुटी राऊ नये यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून रोज माहिती घेतली जात आहे.