Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले, पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज; मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावना

पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले असून, त्यांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. पुण्याचा वाढता विस्तार तसेच नागरिकीकरण यानुसार पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज आहे. पुण्यात काम करताना नागरिकांच्या समस्यासोबतच गुन्हेगारीला लगाम लावण्यात यश मिळाले आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न व सर्वच यंत्रणांनी एकत्र यावे लागेल, असे मत मत मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2022 | 01:57 PM
पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले, पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज; मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भावना
Follow Us
Follow Us:

पुणे : पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले असून, त्यांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. पुण्याचा वाढता विस्तार तसेच नागरिकीकरण यानुसार पुण्याला आणखी पोलीस ठाण्यांची गरज आहे. पुण्यात काम करताना नागरिकांच्या समस्यासोबतच गुन्हेगारीला लगाम लावण्यात यश मिळाले आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न व सर्वच यंत्रणांनी एकत्र यावे लागेल, असे मत मत मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी व्यक्त केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी रात्री बदली झाली. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी गुप्ता यांची नियुक्ती केली. त्यानंतर गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गणेशोत्सव व पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही, असे म्हणत गुप्ता म्हणाले, गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. शहर साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. पुणेरी पाट्या आाणि पुणेकरांची उपहासात्मक टीकेबद्दल ऐकले होते. मात्र, मला काम करताना उपहासात्मक टीकेला सामोरे जावे लागले नाही.

पुणेकरांनी कायम सहकार्य केले. शहरातील टोळ्या व दोन गटातील वादाला बऱ्याच प्रमाणात आटकाव करण्यात यश आले. त्यासोबतच परिसरात भाईगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली. आकडेवारीपेक्षाही गुन्हेगारीचा बिमोड करण्यावर आमचा भर होता. वाहतूक कोंडीवरुन पुणे पोलिसांवर टीका झाली. पण शहरातील अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ या सर्वांचा विचारात घेऊन वाहतूक विषयक सुधारणा करण्यात आल्या. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची गरज

शहराचा वाढता विस्तार तसेच वाढत जाणारी लोकसंख्या पाहता पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. ते दिवसेंदिवस कमी पडत जात आहे. पुण्यात आणखी पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. पुण्यात आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्न पत्रिका फूट आणि लष्करी भरती प्रश्न पत्रिका फूट व बिटकॉईन चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास केला. तपास करताना राजकीय दबाब किंवा हस्तक्षेप झाला नाही. दोन वर्षात पुणे पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली.

Web Title: Pune residents gave a lot of love pune needs more police stations the feeling of police commissioner amitabh gupta is fading nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.