Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

Pune students stuck in Dubai : दुबईमध्ये पिंपरी चिंचवड भागातील इंदिरा या नामांकित विद्यापीठाचे 84 जण दुबईमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप भारतामध्ये आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 01:00 PM
84 students from Pune PCMC Indira University stranded in Dubai during Iran-Israel war

84 students from Pune PCMC Indira University stranded in Dubai during Iran-Israel war

Follow Us
Follow Us:

Pune students stuck in Dubai : पुणे : मध्यपूर्वमध्ये इराण-इस्त्रायल युद्धाची ठिणगी पडली आहे. याचा आता भडका उडाला असून यामधून विनाशकारी युद्धाला सुरुवात झाली आहे. इराण-इस्रायल युद्धामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दुबईमध्ये पिंपरी चिंचवड भागातील इंदिरा या नामांकित विद्यापीठाचे 84 जण दुबईमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप भारतामध्ये आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.

 

पुण्यातील इंदिरा या नामांकित विद्यालयाचे ८४ लोक दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी असून ४ शिक्षकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार आहे असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची खात्री विद्यापीठाने दिली आहे.

हे देखील वाचा : World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

पुण्यातील हे विद्यार्थी “स्टडी व्हिसिट” साठी दुबई येथे गेले होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा पुण्यामध्ये आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे. महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सगळे विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. 42 मुलं आणि 42 मुली असा 84 जणांचा विद्यार्थ्यांचा समूह दुबई येथे गेला होता. आम्ही या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि दुबईमध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांशी सुद्धा संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून न जाण्याचा आवाहन आहे. परराष्ट्र मंत्रालय तसेच भारतीय दूतावासासोबत महाविद्यालयाशी बोलणी सुरू आहे.

हे देखील वाचा :  Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

Iran Israel वादाचे भारतात पडसाद

इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराण आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धाचे पडसाद भारतामध्ये देखील पडू लागले आहे. अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका-इस्रायली ऑपरेशन “ऑपरेशन एपिक फ्युरी” हे येथील अनेक लोक इस्लाम आणि विशेषतः शिया मुस्लिम समुदायावरील हल्ला मानतात. या ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक इराणी नेत्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. भारतामध्ये देखील शेकडो निदर्शक खामेनींचे मोठे फोटो आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सतत “खामेनी चिरंजीव होवो” आणि “अमेरिका आणि इस्रायल मुर्दावाद” अशा घोषणा दिल्या, ज्या त्यांच्या तीव्र संताप आणि विरोधाचे प्रतिक आहे. काश्मीरमध्ये या हल्ल्याचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच हा हल्ला भ्याड असल्याचे देखील म्हटले आहे.

Web Title: 84 students from pune pcmc indira university stranded in dubai during iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Dubai
  • Isarel Iran War
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
1

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?
2

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
3

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
4

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.