Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

मद्यप्राशन केलेल्या माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर (वाहक) चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 05:42 PM
धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्...

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : मद्यप्राशन केलेल्या माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर (वाहक) चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय.38,रा. मुळशी, मुळ. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, भालेराव यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री आठ वाजताच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, भालेराव या पीएमपीएमएलमध्ये वाहक म्हणून नोकरीस आहेत. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्या वाहक म्हणून मनपा ते एसआरए विमाननगर या बसमध्ये कर्तव्यावर होत्या. जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला. त्याने जुना बाजार ते येरवडा असे तिकीट काढले. काही वेळाने तो प्रवाशी बसमधील इतर प्रवाशांना शिवीगाळ करू लागला. त्याने मद्यप्राशन केले असल्याने प्रवाशांनी त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. तरी तो शिवीगाळ करत होता. त्याने तक्रारदारांना इतर प्रवाशांची तिकेटे काढत असताना अडथळा निर्माण केला.

अलंकार चौकात बस आल्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास त्याला खाली उतरण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तो तक्रारदार यांच्या अंगावर धाऊन गेला. तसेच मोठ्याने शिवीगाळ करून त्यांना तिकीट काढण्यापासून परावृत्त करून लगाला. नंतर बस थांबवून त्याला खाली उतरण्यास सांगितले. त्याचा राग आरोपीला आला. त्याने खिशातून चाकू काढून तक्रारदार यांच्या मांडीत मारला. जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला. तक्रारदारांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आद्याप आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

Web Title: A fatal attack on a female conductor in a running pmp bus has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.