Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 

विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 04:53 PM
आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 
Follow Us
Follow Us:

पुणे : विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम रविवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निगडी येथील सीझन्स बँक्वेट अँड लॉन्स येथे होणार आहे. हा सत्कार सोहळा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार भीमराव तापकीर, विधानपरिषद सदस्य उमा खापरे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, विधानपरिषद सदस्य अमित गोरखे, तसेच ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र आणून परस्पर संवाद, स्नेह आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांना एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच नव्याने निवडून आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा मित्र मंडळाचे संयोजक ॲड अतुल पाटील,  दिनेश मोरे,  अजय करंडे,  बाळासाहेब बावकर, अशोक घावटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : शिंदे गटाला मोठा झटका? ‘…उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडले’, कपिल सिब्बल यांचा दावा; सुप्रीम कोर्टात आतापर्यंत काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र राऊत यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहा पैकी 6 जिल्हा परिषद आणि बारा पैकी 12 पंचायत समितीच्या जागा निवडून आणत राऊत यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं होतं.

हे सुद्धा वाचा : ‘सरकारचा हस्तक्षेप नाही’; मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Web Title: A felicitation ceremony for mla rajendra raut is going to be held

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • BJP
  • pune news
  • Rajendra Raut

संबंधित बातम्या

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
1

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
2

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
3

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
4

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.