आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक (संग्रहित फोटो)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट-३ च्या पथकाने आंतरराज्य सोनसाखळी चोरट्याला अटक करून तब्बल १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १०.३ तोळे सोने व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने १५ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यापैकी अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे हेही उपस्थित होते. अक्षय राजू शेरावत (वय 26, हवेली, पुणे), ऋषी बुद्धिमान नानावत (वय 23, हवेली, पुणे), अरमान प्रल्हाद नानावत (वय 26, हवेली, पुणे), सोनु फिरोज गुडदावत (वय 20, शिरुर, पुणे) यांच्यासह खुषालसिंग जोधसिंग राव (वय ४३, रा. ठाणे) या सराफाला अटक करण्यात आलेली आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: डिलिव्हरी बॉयने सतत बेल वाजवल्याच्या रागातून माथेफिरूकडून हवेत गोळीबार; मुंबईमधील घटना
या आरोपीने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच अहमदनगर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. चिखली, दिघी, भोसरी एमआयडीसी, भोसरी, निगडी, सांगवी, दापोडी, महाळुंगे एमआयडीसी, चाकण, दापोडी, शिरुर, शिकरपूर, सुपा, कोळगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. शशिकांत महावळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहेर यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक हिरा माने, विजय वडगावकर, विक्रम माने, सागर जाधव, सचिन सोनवणे, मनोज नाईकवडी, सचिन पवार आदींनी केली.
हेदेखील वाचा : Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण