Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

Pune Water: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराला १३.५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 08:16 PM
पुण्याला एक दिवसाआड पाणी मिळणार?

पुण्याला एक दिवसाआड पाणी मिळणार?

Follow Us
Follow Us:
  • शहराची गरज लक्षात न घेता, पाण्याचा कोटा कमी केला गेला 
  • शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता 
  • जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सातत्याने वाद
Pune Water: विरोधी पक्षात असताना पाणी कपातीच्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते सध्या पुण्याच्या पाणी कपातीच्या निर्णयावर गप्प बसले आहेत. जलसंपदा विभागाने शहराची गरज लक्षात न घेता, पाण्याचा कोटा कमी केला आहे. जनप्रतिनिधींनी पुणेकरांची बाजू न मांडल्याने आता एक दिवस आड पाणी पुरवठा शहराला होणार आहे.

पाणी पुरवठ्यावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सातत्याने वाद निर्माण होत आहे. खडकवासला धरण साखळीतून पुणे शहराला किती टीएमसी पाण्याचा पुरवठा करावा, गरज किती, त्यापोटी महापालिकेकडून जलसंपदा विभागाला कोट्यवधी रुपयांची येणी बाकी असे अनेक मुद्द्यांवर वाद होत आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. खडकवासला धरण साखळीत पुरेसा जलसाठा असतानाही पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार ही कपात केली गेली आहे. परंतु ही कपात करताना, कालवा समितीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव केला गेला. या बैठकीला पुणे शहरातील केवळ तीनच आमदार उपस्थित होते, तसेच पुण्याच्या महापौर देखील उपस्थित नव्हत्या. पुण्याची वाढती पाण्याची गरज याबाबत योग्य बाजू मांडली गेली नसल्याचे दिसत आहे.

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराला १३.५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या मंजूर कोट्यातील ६.३५ टीएमसी पाणी आतापर्यंत वापरण्यात आले आहे. त्यामुळे ३० जून २०२७ पर्यंत पुणेकरांसाठी केवळ ७.१५ टीएमसी पाणी उपलब्ध राहणार आहे. वास्तविक शहराची वाढती लोकसंख्या, महापालिका क्षेत्राची वाढलेली हद्द याचा विचार करणे गरजेचे होते. पुणे शहराची प्रति वर्षाला पाण्याची गरज ही २२ टीएमसीपर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी वर्षभरासाठी केवळ तेरा टीएमसी एवढेच पाणी दिले जाणार आहे. परिणामी, दिवाळीनंतर पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेत नव्याने गावे समाविष्ट झाल्यानंतर पुण्यासाठी दरवर्षी १६.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला होता. मात्र, शहराची लोकसंख्या आता सुमारे ८० लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेला दरमहा सुमारे १.६५ टीएमसी पाण्याची गरज असून, वार्षिक गरज २० टीएमसीपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत मंजूर झालेला १३.५ टीएमसी कोटा अत्यंत अपुरा आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा असला, तरी त्यातून शेती, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवन आणि गळती यांचाही विचार करावा लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटू : भिमाले

या बैठकीला उपस्थित असलेल्या पुणे शहरातील जनप्रतिनिधींकडून आक्रमकपणे बाजू मांडली गेली नाही. पुण्याची वाढती पाण्याची गरज स्पष्ट करता आली नाही. यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. पुणेकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली जाईल, असे पत्रकारांना सांगितले.

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनीही उपलब्ध पाणी आणि प्रत्यक्ष गरज यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महापौर आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शहरातील सर्व भागांना समान दाबाने पाणीपुरवठा करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असून, नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले काय म्हणाले?

    Ans: पुणेकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली जाईल, असे भिमाले म्हणाले.

  • Que: कालवा समितीच्या बैठकीत कोण उपस्थित नव्हते?

    Ans: पुण्याच्या महापौर या कळवा समितीची बैठकीला उपस्थित नसल्याचे समजते आहे.

Web Title: After diwali water supply alternate day bjp leaders silence drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • Pune Water News
  • Pune water supply

संबंधित बातम्या

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…
1

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…

Farmer Crop Loan: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ नको; आमदार श्वेता महालेंच्या सूचना, अमोल साठेंच्या नेतृत्वात भाजपचे निवेदन
2

Farmer Crop Loan: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ नको; आमदार श्वेता महालेंच्या सूचना, अमोल साठेंच्या नेतृत्वात भाजपचे निवेदन

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
4

पुणेकरांना दिलासा ! शहरातील पाणीकपात तूर्त शिथिल; महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.