Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJPचे स्वप्न भंगले, मावळमध्ये APMC समिती झाली बरखास्त; प्रशासकाची नियुक्ती,

कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय वादंग निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी मोठ्या आर्थिक खर्चात निवडून आलेल्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत होते.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 03:08 PM
Agricultural Produce Market Committee in Maval Dissolved Administrator Appointed BJP Hopes Dashed

Agricultural Produce Market Committee in Maval Dissolved Administrator Appointed BJP Hopes Dashed

Follow Us
Follow Us:

Pune Political News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून, समिती बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या राजकीय खेळीला यश मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.

तीन वर्षांपूर्वी मोठ्या आर्थिक खर्चात निवडून आलेल्या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत होते. सभापतीपदी संभाजी शिंदे, तर उपसभापतीपदी नामदेव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे पदांची अदलाबदल न करता या दोघांनी सलग तीन वर्षे पदे कायम ठेवल्याने संचालकांमध्ये असंतोष वाढत गेला.

या पार्श्वभूमीवर असंतुष्ट संचालकांनी अविश्वास ठरावाची तयारी सुरू केली. याची चाहूल लागताच सभापती आणि उपसभापतींनी राजीनामे दिले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही अंतर्गत फुटीमुळे भाजपने सभापतीपद पटकावले. मात्र, हा विजय केवळ काही तासांचाच ठरला. घडामोडींची गंभीर दखल घेत आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी तातडीची बैठक बोलावून राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनाम्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा : अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील…न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

या आदेशानुसार १३ पैकी ९ संचालकांनी तत्काळ राजीनामे दिले, तर उर्वरित ४ संचालकांनी दुसऱ्या दिवशी राजीनामे सादर केले. परिणामी, संचालक मंडळ कोलमडल्याने बाजार समिती बरखास्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले. पहिली बैठकही कोरम अभावी केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली.

यानंतर सहाय्यक निबंधकांकडून अहवाल सादर झाल्यानंतर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 च्या कलम 45(1) अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांनी समिती बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, समितीचे सर्व अधिकार त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : पोटनिवडणुकीच्या प्रचाराने पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार उतरले मैदानात

विशेष म्हणजे, काही संचालकांनी आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात जाऊन भाजपला साथ दिली होती. मात्र, या निर्णयामुळे त्यांनाही मोठा राजकीय फटका बसल्याची चर्चा आहे. एकंदर पक्षांतर्गत मतभेद, फुटीरता आणि आमदार शेळके यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे संपूर्ण समीकरण बदलले असून, मावळ तालुक्यात या राजकीय घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Agricultural produce market committee in maval dissolved administrator appointed bjp hopes dashed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • maval news
  • Pune Politics
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Vasant More on Vidhan Parishad: महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठांना सांगितलंय: वसंत मोरेंचा संताप
1

Vasant More on Vidhan Parishad: महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठांना सांगितलंय: वसंत मोरेंचा संताप

MLC Election : महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर; काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा
2

MLC Election : महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर; काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का
3

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का

Vidhan Parishad Election 2026: पार्थ पवारांची मध्यस्थी यशस्वी, मनधरणीनंतर सुनील टिंगरेंची माघार
4

Vidhan Parishad Election 2026: पार्थ पवारांची मध्यस्थी यशस्वी, मनधरणीनंतर सुनील टिंगरेंची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.