Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाची ‘या’ जागेसाठी मागणी, न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा

हायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जाना न मिळाल्यास त्याठिकाणी बंडखोरी करून निवडणूक लढण्याचा इशाराही काही स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2024 | 12:35 PM
भाजपचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाची ‘या’ जागेसाठी मागणी, न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा
Follow Us
Follow Us:

चिंचवड :  राज्यातील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. महायुती व महाविकास आघाडीतील  जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपासून चिंचवडच्या जागेवरून भाजपमध्येच कुरबूर सुरू असल्याची चर्चा होती. त्यातच आता पुन्हा एकदा चिंचवडच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, चिंचवडची ही जागा, भाजपच्या वाट्याची असताना या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या गटात वाद वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

हेही वाचा: ‘हरियाणात 11 जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर तरी अपडेट नाही,’ जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे. ती जागा त्याच पक्षाला दिली जाणार आहे. चिंचवडच्या जागेवर सध्या भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या जागेवरून निवडून आल्या.  दरम्यान, चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीला घेण्याचे आश्वासनही दिले होते. पण अजित पवारांच्या मागणीमुळे स्थानिक समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महायुतीमध्ये सध्या पिंपरी-चिंचवड विधानसभेची जागा भाजपकडे आहे.  आता महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार या जागेवर भाडपचा दावा असून अश्विनी जगताप यांना किंवा त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.  पण अजित पवारांच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी चिंचवडसाठी आग्रह धरल्याने  या जागेवरून वाद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

पण महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपच्याच वाट्याला जाणार आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जाना न मिळाल्यास त्याठिकाणी बंडखोरी करून निवडणूक लढण्याचा इशाराही काही स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

हेही वाचा: LiveJ&K Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये पहिला विजयी उमेदवार जाहीर

 

Web Title: Ajit pawar groups demand for chinchwad seat will increase bjps tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.