जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप (फोटो सौजन्य-X)
हरियाणात मतमोजणी सुरूवात झाली असून सुरुवातीला ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र हरियाणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबाबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोग जाणूनबुजून डेटा धीम्या गतीने अपडेट करत आहे, ज्यामुळे निकालांची पारदर्शकता धोक्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर धीम्या गतीने निवडणुकीचे ट्रेंड जाणूनबुजून शेअर केले जात आहेत. यामुळे भाजप प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त होत आहे.”, असा आरोप काँग्रेस आयटी सेलचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणुकी आयोगावर केले आहेत.
या प्रक्रियेमुळे मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन होत असून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याचेही ते पुढे म्हणाले. जय राम रमेश यांनी निवडणूक आयोगाला त्वरीत आणि अचूक निकाल सामायिक करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून मतदार आणि जनतेचा विश्वास कायम राहील.
दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “हा ट्रेंड बदलेल, निवडणूक आयोगाची वेबसाइट डेटा अपडेट करत नाही. आमच्या डेटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. चित्र बदलेल.” दुसरीकडे, काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, आम्ही आमच्या एजंटना त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर थांबण्याचे आवाहन करतो.
हिमाचल प्रदेशचे मंत्री आणि काँग्रेस नेते जगत नेगी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकी 2024 वर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “हरयाणातील जनता गेली 10 वर्षे भाजपवर खूश नव्हती. जर भाजप जिंकला तर ते लोकशाहीचे दुर्दैव असेल.” भाजपच्या आत्मविश्वासावरही नेगी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले, “काहीतरी गडबड असावी, त्यामुळेच अनेक गोष्टी त्यांच्या विरोधात असतानाही भाजपचे लोक आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहेत.” ते पुढे म्हणाले, “अनेक प्रकारचे दोष आहेत. ईव्हीएम बदलणे की आत काही करणे हा तपासाचा विषय आहे.”
Like the Lok Sabha elections, in Haryana we are again witnessing slowing down of uploading up-to- date trends on the ECI website. Is the BJP trying to build pressure on administration by sharing outdated and misleading trends @ECISVEEP?
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 8, 2024
आत्तापर्यंतच्या हरियाणा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला सतत आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय INLD दोन आणि इतर पाच जागांवर पुढे आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे आणि जर या ट्रेंडचे परिणामांमध्ये रूपांतर झाले, तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असेल.