Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस वितरणातील शहरी-ग्रामीण भेदभाव दूर करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आंदोलनाचा इशारा

शहरी आणि ग्रामीण भागातील एलपीजी गॅस वितरणात होत असलेला भेदभाव त्वरित दूर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 18, 2026 | 05:20 PM
गॅस वितरणातील शहरी-ग्रामीण भेदभाव दूर करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आंदोलनाचा इशारा

गॅस वितरणातील शहरी-ग्रामीण भेदभाव दूर करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : शहरी आणि ग्रामीण भागातील एलपीजी गॅस वितरणात होत असलेला भेदभाव त्वरित दूर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी शहरी भागाच्या तुलनेत दुप्पट प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करत, हा अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायतीने दिला आहे.

 

सध्या जागतिक पातळीवर इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. आपला देशही यापासून सुटलेला नाही. या जागतिक घडामोडींमुळे एलपीजी सिलिंडर वितरण व्यवस्थेवर ताण येत असून, त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही वितरण कंपन्यांकडून शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

२५ विरुद्ध ४५ दिवसांची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहरी भागातील ग्राहकांना पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा गॅस सिलिंडर २५ दिवसांच्या अंतराने मिळतो. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांना याच दुसऱ्या सिलिंडरसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. “ग्राहक कोणत्याही भौगोलिक भागात राहत असला, तरी त्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा समान निकषांनुसार मिळणे अपेक्षित आहे. हा स्पष्टपणे ग्राहक हक्कांचा भंग आहे,” असे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, प्रधान सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या भेदभावपूर्ण धोरणाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण ग्राहकांवरील हा अन्याय तातडीने दूर करावा, अन्यथा ग्राहक पंचायत राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असेही पाठक यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : सावरलेलं पुन्हा बिनसलं? Hormuz मार्ग खुला… तेलाच्या किमती कोसळल्या; Gas ही झाला स्वस्त, पण Trump यांच्या विधानाने नवा ट्विस्ट

LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय

गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता महागड्या एलपीजीसाठी एक स्वस्त आणि शाश्वत एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे. भारत सरकार आणि काही खाजगी कंपन्यांच्या पुढाकाराने आता LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. कोणता आहे तो पर्याय? आणि यामुळे नेमका कसा फायदा होणार सविस्तर जाणून घेऊयात. भारत सरकार आणि काही खाजगी कंपन्यांच्या पुढाकाराने आता LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. ‘एथेनॉल कुकिंग स्टोव्ह’ बाजारात आणले जात आहेत. यामुळे स्वयंपाकाचा खर्च निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

Web Title: All india consumer panchayat has warned of agitation over gas distribution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Chagan Bhujabal
  • CM Devedra Fadnavis
  • Gas Cylinder

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
4

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.