Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार (दि.२१) रोजी संपताच लोणी काळभोर गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 23, 2026 | 11:59 AM
लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

Follow Us
Follow Us:
  • लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी
  • उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात
  • मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर
कदमवाकवस्ती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार (दि.२१) रोजी संपताच लोणी काळभोर गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून निवडणूक रिंगणात थेट ताकद लावली आहे. त्यामुळे या गटात अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव असल्याने या जागेकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. या गटातून विजय मिळवणे हे केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता पक्षाच्या ताकदीचे प्रतीक मानले जात असल्याने प्रत्येक पक्षाने सर्वतोपरी तयारी केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक ही केवळ उमेदवारांमधील नव्हे, तर थेट पक्षीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी पूनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी श्वेता कमलेश काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे यांची नावे जाहीर करून भाजपने संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार

मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या गटात ताकदीची मांडणी करत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी रेश्मा काळभोर आणि कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अमोल टेकाळे यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीकडूनही ही निवडणूक गांभीर्याने घेतली जात असून, पक्षाची पारंपरिक मतपेढी सांभाळत विजय मिळवण्यावर भर दिला जात आहे.

हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

Web Title: All political parties are preparing vigorously for the elections in the loni kalbhor group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • NCP News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
1

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
2

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा
3

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले
4

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.