Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूवरुन अमित गोरखे आक्रमक; सभागृहात केली ‘ही’ मोठी मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी दिपाली विलास कोमटी या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 06:02 PM
आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूवरुन अमित गोरखे आक्रमक; सभागृहात केली 'ही' मोठी मागणी

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूवरुन अमित गोरखे आक्रमक; सभागृहात केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी चिंचवड : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी दिपाली विलास कोमटी या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि संवेदनाहीनता यामुळेच एका निष्पाप मुलीला प्राण गमवावे लागले असून, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार अमित गोरखे यांनी आज सभागृहात केली आहे.

 

नेमकी घटना काय?

या गंभीर घटनेकडे सरकारचे लक्ष वेधताना आमदार गोरखे यांनी शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिपाली आजारी असताना शाळा प्रशासनाने तिच्या पालकांना वेळेवर कोणतीही माहिती दिली नाही. उलट, अत्यंत उशिरा इतर विद्यार्थ्यांमार्फत पालकांना निरोप धाडण्यात आला. जेव्हा तिची आई शाळेत पोहोचली, तेव्हा मुलीची प्रकृती चिंताजनक होती. शाळेने उपचार तर दूरच, पण साधी माणुसकीही दाखवली नाही. अखेर आईने स्वतः धावपळ करून तिला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आमदार अमित गोरखे यांची भूमिका

दिपालीच्या आजारपणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापकांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या आश्रम शाळेचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या संस्थेवर शासनाने तातडीने ‘प्रशासक’ नियुक्त करावा. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पीडित कोमटी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गोरखे यांनी केली.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्वासाने आपली मुले प्रशासनाच्या स्वाधीन केलेली असतात. जर प्रशासन इतके बेजबाबदार असेल, तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. सरकार हे खपवून घेणार नाही. दोषींना शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…

Web Title: Amit gorkhe has taken an aggressive stand on the death of a girl student at ashram school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Death
  • Yavatmal

संबंधित बातम्या

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत
1

सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम; राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती गठीत

Maharashtra Police Housing: पोलीस दलासाठी मोठी बातमी! ५,४५९ घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
2

Maharashtra Police Housing: पोलीस दलासाठी मोठी बातमी! ५,४५९ घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
3

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली
4

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.