Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत कोसळली. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 06:20 PM
देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

Follow Us
Follow Us:

पुणे : चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत (गॅप) कोसळली. मात्र पुणे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले. ही घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३८ वाजता घडली आहे.

 

गाडी क्रमांक ११०१४ कोइम्बतूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना अंगवी शेख (रा. सारा अपार्टमेंट, शिवाजी नगर, मुंब्रा, ठाणे) या महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. चढताना त्यांचा पाय फूटबोर्डवरून घसरला आणि त्या ट्रेन व प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडल्या. त्याच वेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाजन यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत महिलेला पकडले आणि जोराने ओढून सुरक्षित बाजूला आणले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 28 हेक्टर जागेमध्ये ‘आयआयएम’; राज्याच्या महसूल व वन विभागाकडून अध्यादेश जारी

ही संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरपीएफच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत केलेल्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना पुन्हा आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये.

“ट्रेन चुकण्याच्या भीतीने मी चालत्या गाडीत चढण्याचा धोका पत्करला होता. माझे प्राण वाचवल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाजन आणि आरपीएफ पथकाचे मनापासून आभार.” — अंगवी शेख, प्रवासी महिला.

हे सुद्धा वाचा : चिखली-मोशी परिसरात उभारणार आधुनिक एसटी स्थानक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

Web Title: An rpf jawan saved the life of a female passenger at pune railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Railway Station News
  • Train News

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.