Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

डीजे आणि लाऊड स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे, तर पाळीव व भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांनाही बसत आहे. प्रचंड आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे प्राण्यांमध्ये भीती, मानसिक तणाव, आक्रमकता तसेच कानाच्या विकारांच्या तक्रारी वाढत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 05:09 PM
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे/ पुणे : डीजे आणि लाऊड स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे, तर पाळीव व भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांनाही बसत आहे. प्रचंड आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे प्राण्यांमध्ये भीती, मानसिक तणाव, आक्रमकता तसेच कानाच्या विकारांच्या तक्रारी वाढत आहेत. सणासुदीच्या काळात प्राण्यांमधील कानाच्या विकारांशी संबंधित रुग्णसंख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. डीजेच्या वाढत्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी नुकत्याच झालेल्या आंदोलनात मुक्या प्राण्यांच्या संरक्षणाचे संदेश असलेले फलक झळकावले. उत्सव साजरे करताना ध्वनीमर्यादेचे पालन करण्याची मागणी प्राणिमित्रांकडून करण्यात आली.

तज्ञांच्या मते, श्वानांची श्रवणक्षमता मानवापेक्षा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे डीजेच्या प्रचंड आवाजाचा त्यांना मोठा त्रास होतो. तीव्र आवाजामुळे कानाच्या पडद्याला इजा होणे, कानात संसर्ग होऊन स्राव येणे तसेच तात्पुरते किंवा कायमचे बहिरेपण येण्याच्या घटना घडू शकतात. मोठ्या आवाजामुळे प्राणी घाबरून सुरक्षित जागेच्या शोधात वाहनांखाली किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात लपतात. अशा वेळी कोणी जवळ गेल्यास भीतीपोटी ते चावा घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा : डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

दुभत्या जनावरांवरही परिणाम

डीजेच्या दणदणाटाचा परिणाम दुभत्या गाई-म्हशींवरही होतो. प्रचंड आवाजामुळे त्यांच्यावर ताण निर्माण होऊन दूध देण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पक्षी आवाजामुळे विचलित होऊन सुरक्षित जागेच्या शोधात भटकतात. वटवाघळांसारखे निशाचर प्राणी आवाजाच्या कंपनांमुळे दिशाभूल होण्याची शक्यता असते. सरपटणाऱ्या प्राण्यांना कान नसले तरी जमिनीवर निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांचा त्यांच्या हालचालींवर परिणाम होतो.

‘‘डीजे आणि फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव तसेच भटक्या प्राण्यांमध्ये मोठा मानसिक तणाव निर्माण होतो. प्रचंड आवाजामुळे प्राणी घाबरून आक्रमक होण्याच्या घटनाही घडतात. शहरी भागातील पक्षी आणि वटवाघळांच्या हालचालींवरही तीव्र आवाज व कंपनांचा परिणाम होतो. सरपटणारे प्राणीही जमिनीवरील कंपनांमुळे अस्वस्थ होतात.’
-डॉ. कुणाल मुनाळे , पशुवैद्यकीय तज्ञ

हे सुद्धा वाचा : पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

Web Title: Animals are also being distressed by the deafening noise of djs and loudspeakers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • DJ Speaker
  • pune news

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
1

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
2

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी
3

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य
4

Pune Ganeshotsav DJ Ban Row: गणपतीत DJ वाजणार की बंद होणार? पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.