सौजन्य - सोशल मिडीया
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलिस फौजदार पी. एस. पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत ऐरोलीतील साची लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी एक व्हिडिओ तयार केला होता तसेच नऊ पानांची सविस्तर सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस दलातील ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या आधी सुसाईड नोट मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं लिहिली आहे. तसंच त्यांनी एक व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करून ठेवला होता. यामध्ये त्यांनी तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे, सध्या आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांनी मला त्रास दिला आहे, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्याच बरोबर पी.एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. ऐरोली मधील लॅाजवर जाऊन फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी न्याय द्यावा, जय हिंद महाराष्ट्र पोलीस, जय महाराष्ट्र पोलीस, असं म्हणत पाटील यांनी अखेरचा निरोप घेतला.
घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी एक ८ पानाची नोट सुद्धा लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे, त्यामुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






