Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाणेरमध्ये पाच वर्षे ‘लोडशेडिंग’ची भीती; गायरान जागा निश्चित होऊनही प्रकल्प रखडला

बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक बिघाडाचा प्रश्न नसून रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या गंभीर नियोजन शून्यतेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 05:39 PM
बाणेरमध्ये पाच वर्षे 'लोडशेडिंग'ची भीती; गायरान जागा निश्चित होऊनही प्रकल्प रखडला

बाणेरमध्ये पाच वर्षे 'लोडशेडिंग'ची भीती; गायरान जागा निश्चित होऊनही प्रकल्प रखडला

Follow Us
Follow Us:

पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक बिघाडाचा प्रश्न नसून रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या गंभीर नियोजन शून्यतेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटी हब म्हणून वेगाने विस्तारत असलेल्या या भागात वीजेची मागणी झपाट्याने वाढत असताना, नवीन सबस्टेशन उभारणीला होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना पुढील पाच ते सात वर्षे अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो.

 

गेल्या काही दिवसांतील सततच्या वीज खंडितीमुळे संतप्त नागरिकांनी महावितरणविरोधात आंदोलन छेडले होते. त्यानंतर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, बालेवाडी सर्व्हे क्रमांक ४ येथील प्रस्तावित सबस्टेशनसाठी राखीव जागेची पाहणीही करण्यात आली.

सध्या बाणेर-बालेवाडी परिसराला एनसीएल ईएचव्ही केंद्रातून सुमारे १५० मेगावॅट, तर सूस-म्हाळुंगे परिसराला हिंजवडी ईएचव्ही केंद्रातून ७५ मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. मात्र वाढते नागरीकरण, उंच इमारती आणि आयटी कंपन्यांचा विस्तार यामुळे ही क्षमता अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, प्रस्तावित सबस्टेशनसाठीची गायरान जागा २०१९-२०२० मध्येच महापारेषण आणि महावितरणला सुचवण्यात आली होती. मात्र प्रशासकीय दिरंगाई, निधीअभावी नियोजनातील त्रुटी आणि प्रभावी पाठपुराव्याच्या अभावामुळे हा प्रकल्प आजही रखडलेलाच आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून २०२७-२८ पर्यंत निधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.

हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?

दरम्यान, प्रस्तावित जागेवर अजूनही डेब्रीस आणि राडारोड्याचे ढिगारे असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सबस्टेशन पूर्ण झाल्यास अतिरिक्त १५० मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध होणार असला, तरी तोपर्यंत नागरिकांना अंधार, वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि दैनंदिन गैरसोयी सहन कराव्या लागणार आहेत.

नवीन सबस्टेशन उभारण्यासाठीची गायरान जागा २०१९-२०२० मध्येच महापारेषण आणि महावितरणला सुचवली होती. मात्र प्रशासनाचा विलंब आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रकल्प रखडला आहे. – अमोल बालवडकर, नगरसेवक.

Web Title: Baner balewadi residents likely to face irregular power supply for many years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.