पुणे -मुंबई एक्स्प्रेस वर बोरघाटात मध्यरात्री बसचा अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा टँकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी उभा होता. मुंबईच्या दिशेने वेगाने येणारी खासगी बस या टँकर ला धडकली.
या प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांना प्राण गमवावे लागले. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही जण बोरघाटात सुरू असलेल्या कामावरील मजूर आहेत.
या अपघातात खासगी बस चालक गंभीर जखमी झाला असून 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
बसमधील प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईला पाठवण्यात आले आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची अॅम्ब्युलन्स व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, ॲप्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत यांनी अपघात घडलेल्या ठिकाणी मदत केली.