पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी एनसीपी पक्षामध्ये राजकारण सुरु झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार की नव्या आणि तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. अध्यक्षपदासोबतच उपाध्यक्ष आणि विविध सभापतीपदांसाठीही इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने अंतर्गत चर्चा निर्णायक ठरणार आहेत.
हे देखील वाचा :
दौंड तालुक्यातील खडकी गटातून वीरधवल जगदाळे, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी गटातून विवेक वळसे पाटील, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गटातून सुजाता पवार, इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून अंकिता हर्षवर्धन पाटील, काटी गटातून श्रीमंत ढोले, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गटातून शांताराम इंगवले तसेच भोर तालुक्यातील भोंगवली गटातून विक्रम खुटवड यांसारखे अनुभवी सदस्य पुन्हा एकदा सभागृहात पोहोचले आहेत. यापैकी काहींना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मोठा अनुभव असून, त्यांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा :
दुसरीकडे, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या तरुण सदस्यांची संख्याही लक्षणीय आहे. डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तुषार रमेश थोरात, यशराज आप्पासाहेब जगदाळे, सुनीता बुट्टे-पाटील, करण खलाटे आदी नवोदितांची नावेही चर्चेत आहेत. यापूर्वी काही वेळा पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्याला अध्यक्षपदाची संधी देण्याचा प्रयोग यशस्वी ठरला होता. त्यामुळे तरुण नेतृत्वाला संधी देऊन नवे समीकरण मांडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत पक्षाला मिळालेल्या भरघोस यशामुळे त्या भागातील सदस्याला अध्यक्षपद देण्याची मागणीही काही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. विशेषतः दौंड तालुक्यात ७ पैकी ६ गटांत विजय मिळवल्याने त्या भागाची राजकीय ताकद अधोरेखित झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय श्रद्धांजली म्हणून या पट्ट्यातील सदस्याला संधी द्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.






