Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

CM Fadnavis: आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवावे यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 06:52 PM
Cm devendra fadnavis

Cm devendra fadnavis

Follow Us
Follow Us:
  • बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल
  • पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्धार व्यक्त
  • बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभ
पुणे/ CM Devendra Fadnavis: बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहातील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LIVE | Bhoomipujan of the Bajaj Finserv Campus 🕜 1.39pm | 4-9-2026📍Pune.@Bajaj_Finserv#Maharashtra #Pune #BajajFinservhttps://t.co/TLpYF9CQ3p — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 4, 2026

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे आणि मुंबई देशातील फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी झाली आहेत. पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळूरुला मागे टाकले असून एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे. फिनटेक स्टार्टअपमध्येही मोठी वाढ झाली असून ५९ टक्के वाढ आणि ९०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे. लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे वेगाने वाढणारे शहर आहे. या वेगाला अनुरूप आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसोबत भुयारी मार्गाचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करायची असून त्यामध्ये बजाज फिनसर्व्हचा आधुनिक परिसर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणारे बजाज फिनसर्व्ह पुणे परिसर आणि त्यातील सुविधा देशातील महत्वाची आणि शाश्वत व्यवस्था ठरणार आहे. या व्यवस्थेत सुमारे ४० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. परिसराला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वी उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बजाज समुहाने पुण्यात कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मनोदय व्यक्त केला असून महानगरपालिकेसह सर्वांच्या सहकार्याने असे केंद्र उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवावे यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक भक्कम करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने राज्य शासनासोबत सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

बजाज फिनसर्व्हने फायनान्शियल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या क्षेत्रात आधुनिकता आणल्याने फिनटेक क्षेत्रातील महत्वाची संस्था म्हणून या समूहाकडे पाहिले जाते असे नमूद करून बजाज समूहाने स्थापनेपासून भारताचा औद्योगिक विकास आणि राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाचा आणि शासनाच्या सामाजिक उपक्रमातील सहभागाचा मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

Web Title: Cm devendra fadnavis bajaj finservs headquarters and pune transport system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Bajaj
  • CM Devendra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 
1

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!
2

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…
3

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.