Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: कॉक्रोचेसच्या ५ मोठ्या मागण्या; छ. शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा नकाशा NCERT च्या पुस्तकात समाविष्ट करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (गुरुवार, ११ जून) पुण्यात अंदोलन करण्यात आले. कथित NEET पेपरफुटीवरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन सुरु झाले

  • By विवेक
Updated On: Jun 11, 2026 | 09:45 PM
Cockroach Janta Party Protest at Pune,

Cockroach Janta Party Protest at Pune,

Follow Us
Follow Us:

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (गुरुवार, ११ जून) पुण्यात अंदोलन करण्यात आले. कथित NEET पेपरफुटीवरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन सुरु झाले. यावेळी, CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक हेदेखील उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी CJP कडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पाच मोठ्या मागण्या ठेवण्यात आल्या.

सोशल मीडियावर सुरु झालेल्या या आंदोलनाला प्रत्यक्षातदेखील हजारो तरुणांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनस्थळी गर्दी केली. याआधी दिल्लीतील जंतर मंतर, आणि आता पुण्यात या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात विद्यार्थी आणि युवकांसह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.

‘कॉक्रोचेस’ च्या प्रमुख ५ मागण्या कोणत्या?

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:

  • जर कोणत्याही परैक्षेचा पेपर फुटला, तर प्रभावित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला १० हजार रुपयांची भरपाई मिळावी.
  • परीक्षा आयोजित करण्याआधी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे ऑडिट करण्यात यावे. मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीस हे टेंडर मिळू नये.
  • परीक्षेचा निकाल ठराविक मुदतीचा व्हायला हवा.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च सरकारने द्यावा.
  • NCERT च्या पाठयपुस्तकांमधून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात सामील करावा.
सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, ‘गोकुळ’विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार

धार्मिक राजकारणाला CJP चा विरोध

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने यावेळी धार्मिक राजकारणावरून सरकारवर प्रश्न उपस्थित केले. ‘यापुढे तरुण पिढी कोणत्याही हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक राजकारणाला बाली पडणार नसल्याचं आश्वासन सर्वांनी दिल पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. सरकारच हिंदू-मुस्लिम राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशारा CJP कडून देण्यात आला.

अभिजित दीपकेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

यावेळी अभिजित दीपकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात कि या आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे कि हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? मुख्यमंत्री टीका करतात कि आम्हाला संविधान माहित नाही. आम्ही फक्त पुस्तक हातात पकडले आहे. मला त्यांना उलट विचारायचं आहे कि चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, ते त्यांनी सांगावं,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Web Title: Cockroach janta party protest at pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Cockroach Janta Party
  • Protest
  • pune news

संबंधित बातम्या

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
1

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
2

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
3

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
4

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.