युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी(१० मार्च) पहाटे ४ पासून लोक एजन्सीच्या बाहेर जमा झाले आहे. लोकांनी सिलेंडर अक्षरश: खाद्यांवर घेऊन पळत सुटले आहेत. देशातील उर्जा संकटाचे हे भयावह चित्र पाहायाला मिळत आहेत.
Visuals from Mahadeva Gas agency, Basti, Uttar Pradesh pic.twitter.com/xz3F2KNiNP — Piyush Rai (@Benarasiyaa) March 11, 2026
दुसरीकडे गोरखपुरमघ्येही एका गॅस एजन्सीबाहेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेसली आहे. लोकांमध्ये रांगेत उभे राहण्यावरुन वाद झाला आहे. सुरुवातील हा वाद शाब्दिक होता, परंतु याचे हाणामारीत रुपांतरित झाले आहेत. पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका आताचा आहे का जुना व्हिडिओ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गैस के लिए यह जूतम-पैजार गोरखपुर में हो रहा है! सूचना समाप्त 🙏 pic.twitter.com/fC0rAcY78q — Dayanand singh (कैजुअल मजदूर) Social Media (@Dayanan19058909) March 12, 2026
सध्या मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका जगभरात बसत आहे. LPGच्या तुटवड्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसाय बंद केला आहे. तर मोठ्या हॉटेल्समध्ये किंमती वाढल्या आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






