Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA News: ‘पीएमआरडीए’च्या ४६ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार

तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2025 | 02:35 AM
PMRDA News: 'पीएमआरडीए'च्या ४६ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार

PMRDA News: 'पीएमआरडीए'च्या ४६ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार

Follow Us
Close
Follow Us:
पीएमआरडीएच्या ४६ भूखंडांची होणार ई-लिलाव प्रक्रिया
संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार
जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील (तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील) एकूण ४६ भूखंडाचे ई-लिलाव करण्यात येणार आहे. ८० वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्टयाने ई-लिलाव होत असून नोंदणी व निविदा दस्तऐवज दि. १६ ऑक्टोबरपासून दि. ३० पर्यंत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.

या भूखंडामध्ये शैक्षणिक वापराचे ३ भूखंड, वाणिज्य व सार्वजनिक सुविधेचे ११ भूखंड, वैद्यकीय वापराचे १ भूखंड, सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत शाळा) १ भूखंड, (Facility Center) १ भूखंड आणि सुविधा भूखंड (Amenity Space) २९ भूखंड असे एकूण ४६ भूखंड यांचे ८० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने ई-लिलावाव्दारे वाटप होणार आहे.तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे.

सदर ई- लिलाव प्रक्रियेसंबधी सूचना सविस्तर अटी व शर्तीचे माहितीपुस्तिका https://eauction.gov.in व https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) निर्णायक पावले उचलली आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर आता वेळेचे निर्बंध, चालकांची नशेची तपासणी आणि वाहतूक नियमांचे पालन या अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची कामे तात्पुरती थांबवण्यात येणार आहेत, असा इशारा पीएमआरडीएकडून देण्यात आला आहे.

हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासन सजग

अवजड वाहनांमुळे हिंजवडी व आसपासच्या भागात गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करत मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची व बांधकाम व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत हिंजवडी, माण, म्हाळुंगे परिसरात पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच वाहनचालक नशेत नसल्याची खात्री, वैध परवाना आणि संबंधित वाहनांची संपूर्ण माहिती प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: Commissioner yogesh mhase said start e auction process of 46 pmrda plots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • PCMC News
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
2

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
4

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.