Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक पुण्याची ‘हेरिटेज सफर’ जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण…

ऐतिहासिक वारसा, अध्यात्म, गडकिल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे केंद्र असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांत 'सांस्कृतिक पर्यटनाला' मोठी चालना मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 02:53 PM
ऐतिहासिक पुण्याची 'हेरिटेज सफर' जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण...

ऐतिहासिक पुण्याची 'हेरिटेज सफर' जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण...

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : ऐतिहासिक वारसा, अध्यात्म, गडकिल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे केंद्र असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांत ‘सांस्कृतिक पर्यटनाला’ मोठी चालना मिळाली आहे. केवळ इतिहास वाचणे नव्हे, तर तो प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, वास्तुकला पाहण्यासाठी आणि स्थानिक संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभरातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो पर्यटक पुण्याकडे आकर्षित होत असल्याचे सुखद चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 

पेशवाईच्या वैभवाचा साक्षीदार असलेला ‘शनिवारवाडा’ हा पुण्याच्या सांस्कृतिक पर्यटनाचा मुख्य कणा मानला जातो. येथील भव्य वास्तुरचना, पेशवाईचा इतिहास आणि संध्याकाळी होणारा ‘ध्वनी-प्रकाश कार्यक्रम’ पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा हे शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे आणि पर्यटनाचे प्रमुख प्रतीक बनले आहे. शनिवारवाड्यासोबतच शहरातील इतर ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये मुख्यत्वे: आगा खान पॅलेस, लाल महाल, विश्रामबाग वाडा. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. पुण्यात सध्या आयोजित केल्या जाणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमांमध्ये या सर्व स्थळांचा समावेश केला जात असून, नागरिक, परदेशी पर्यटक आणि विशेषतः तरुणाईकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

अर्थव्यवस्थेला गती, पण आव्हाने कायम

सांस्कृतिक पर्यटनाच्या या वाढत्या विस्तारामुळे पुण्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असून हॉटेल, वाहतूक आणि गाईड्स यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. तसेच वारसा संवर्धनाच्या कामालाही बळ मिळत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, पुण्यातील पर्यटन अधिक जागतिक दर्जाचे करण्यासाठी खालील गोष्टींवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे:

  • पर्यटन स्थळांवरील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन.
  • पायाभूत सुविधा (पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग).
  • अधिकृत आणि प्रशिक्षित मार्गदर्शक (Guides) व्यवस्था.
  • ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग.
“सध्या जी ‘वारसा भटकंती’ सुरू आहे, त्यामुळे शाळकरी मुलांना आणि तरुणांना ऐतिहासिक जागा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. इतिहास जेवढा पुस्तकातून वाचला जातो, त्यापेक्षा त्या ऐतिहासिक जागांना प्रत्यक्ष भेट देणे जास्त गरजेचे असते. वारसा पाहणे ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून त्यातून एक सामाजिक जनजागृती निर्माण होते. यातूनच तरुणांना हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याची नवी प्रेरणा मिळते.”— केतन पुरी (इतिहास अभ्यासक)

Web Title: Cultural tourism has received a major boost in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Indian Tourist
  • pune news
  • tourism

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
1

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
3

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.