सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता बुट्टे, अरुण चांभारे, जि. प. सदस्य गणेश बोत्रे, बाबा राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, कैलास सांडभोर, मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चाकण येथील चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासह परिसरातील विकासकामे पूर्ण करून अजितदादांची विकासाची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. खेड तालुक्यातील विकासकामांसाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरले आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
हे सुद्धा वाचा : आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खेड तालुक्यावर कायम विशेष प्रेम होते. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच भरीव मदत केली. चाकणच्या विकासासाठी महापालिका होणे ही काळाची गरज आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून डीपीआर मंजुरीचा प्रश्न प्रलंबित आहे. चाकण महापालिका झाल्यास वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांसह अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ans: चक्रेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.
Ans: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Ans: चाकणमध्ये वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि रस्त्यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महापालिका होणे काळाची गरज असल्याचे दिलीप मोहिते यांनी सांगितले.






