Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. परिसरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ संबंधित यंत्रणांना दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2026 | 05:36 PM
चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा...; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा...; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. परिसरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ संबंधित यंत्रणांना दिली आहे. मुदतीत काम न झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंते यांच्यावर कारवाई आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. तसेच शुक्रवारपासून एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर दुचाकीपासून अवजड वाहनांपर्यंत कोणत्याही वाहनाला पार्किंग करता येणार नाही. नियम मोडणारी वाहने थेट जप्त केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

चिंचवड पोलिस आयुक्तालयात मंगळवारी (दि. १८) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यावेळी उपस्थित होते. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, ओव्हरलोडिंगसह विविध समस्या गंभीर झाल्या आहेत. या परिसरात एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद आणि जिल्हा परिषद अशा अनेक यंत्रणा काम करतात. मात्र, त्यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. रस्ते, कचरा, वीज वितरणातील हानीसह विविध विषयांवर या समितीच्या माध्यमातून बैठका घेण्यात येत आहेत.

पुणे-पिंपरीतून चाकणला जाणाऱ्यांचे चार तास कोंडीत

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून चाकण एमआयडीसीत कामासाठी जाणाऱ्या हजारो नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकांचा सकाळी दोन आणि सायंकाळी दोन असे जवळपास चार तास प्रवासात खर्च होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, खराब साइडपट्ट्या आणि रस्त्यालगत होणारे वाहनांचे पार्किंग ही वाहतुकीचा वेग मंदावण्याची प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

३१ ऑगस्टची ‘डेडलाइन’

एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेसह संबंधित सर्व यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुदतीत एक दिवसाचाही विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा, अभियंते आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

रस्त्यावर पार्किंग केले तर वाहन जप्त

चाकण एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची एक ते दोन लेन पार्किंगमध्येच व्यापली जाते. त्यावर उपाय म्हणून एमआयडीसीकडील उपलब्ध मोकळ्या जागा पार्किंगसाठी वापरण्यात येणार आहेत. तळेगावपासून एमआयडीसीच्या विविध टप्प्यांपर्यंत उपलब्ध मोकळ्या भूखंडांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. शुक्रवारपासून अधिसूचित परिसरातील रस्त्यांवर कोणतेही वाहन उभे करण्यास परवानगी नसेल. नियम मोडणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली जाणार असून, जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र जागाही निश्चित करण्यात आली आहे.

पार्किंग हटल्यास वेग २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार?

रस्त्याच्या कडेला होणारे पार्किंग पूर्णतः हटविल्यास प्रत्येक रस्त्यावर किमान एक ते दोन लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे वाहतुकीचा वेग २५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे. प्रत्येक संबंधित विभागाला ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियमनासाठी १०० एमएसएफ जवान

चाकण एमआयडीसीचा विस्तार आणि वाहनांची संख्या पाहता वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) १०० जवान वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दोन-तीन दिवसांत, जास्तीत जास्त आठवडाभरात हे जवान उपलब्ध होतील. दोन शिफ्टमध्ये त्यांचा वाहतूक नियमनासाठी वापर केला जाणार आहे.

इंधन संपून वाहन बंद पडले तरी कारवाई

रस्त्यावर अवजड वाहन बंद पडल्यानेही मोठी कोंडी होते. काही वाहनचालक अत्यल्प इंधनावर वाहने चालवतात आणि वाहन बंद पडल्यानंतर डिझेल संपल्याचे कारण सांगतात. अशा वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. बंद पडलेली अवजड वाहने तातडीने हटविण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

अतिक्रमणांवर २५ ऑगस्टपासून हातोडा

रस्त्यांलगतची अतिक्रमणेही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे प्रशासनाच्या पाहणीत समोर आले. चहाच्या टपऱ्या, अनधिकृत गोदामे तसेच अन्य व्यावसायिक अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. अतिक्रमणधारकांना सात दिवसांची नोटीस दिल्यानंतर २५ ऑगस्टपासून कारवाई सुरू करण्यात येईल. महिनाभरात अतिक्रमणे हटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण काढल्यानंतर ती जागा पुन्हा अतिक्रमित होऊ नये यासाठी तेथे तातडीने रस्ता विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात १९ किलोमीटरवर ‘फोकस’

वाहतूक कोंडी सर्वाधिक होणाऱ्या सुमारे १९ किलोमीटरच्या पट्ट्यावर प्रशासन प्रथम लक्ष केंद्रित करणार आहे. या मार्गावरील खड्डे, अतिक्रमणे, पार्किंग आणि वाहतूक नियमनाचे प्रश्न एकाचवेळी हाताळून तातडीने दिलासा देण्याचे नियोजन आहे.

‘एआय’ ठेवणार वाहतूक कोंडीवर नजर

चाकण एमआयडीसीतील वाहतूक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. परिसरात कॅमेऱ्यांचे जाळे उभारून ते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडले जाणार आहे. कोणत्या ठिकाणी वाहतुकीचा ‘रेड झोन’ तयार झाला, कुठे कोंडी झाली किंवा कोणते वाहन रस्त्यात बंद पडले, याची माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ मिळेल. त्यानुसार पोलिसांना तातडीने उपाययोजना करता येणार आहेत.

चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागतील. एक दिवसाचाही विलंब झाल्यास संबंधित यंत्रणा, अभियंते आणि कंत्राटदारांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल. रस्त्यावरील पार्किंगबाबतही ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात येणार आहे. -जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.

चाकणच्या परस्थितीला प्रशासनच जबाबदार

चाकण मधील खड्डे, वाहतूक कोंडी, विजेचा तुटवडा आणि इतर सुविधा मिळत नसल्याने झालेल्या परस्थितीचे आम्ही जबाबदारी स्वीकारत आहे. या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या ‘एजन्सी’मुळे एकमेकांत समनव्यांचा अभाव आहे. यातून ही भयानक स्थिती झाली असून ती सुधारण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्र येऊन एका छताखाली काम सुरु असल्याचे स्वतः जिल्हाधिकारी डुडी यांनी मान्य केले.

हे सुद्धा वाचा : शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून ‘या’ मोहिमेची होणार सुरुवात

तेरा दिवसात चाकण खड्डेमुक्त?

चाकण एमआयडीसीचा परिसर मोठा आहे. यातील सर्वच रस्त्यावर खड्याचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेली कित्येक वर्षे चाकणच्या खड्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, त्यामुळे येणाऱ्या अवघ्या 13 दिवसात चाकण खड्डेमुक्त होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: District collector jitendra dudi has ordered officials to fill the potholes in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग
1

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
2

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय; मध्यरात्री 12 वाजल्यापासून ‘हा’ आदेश लागू
3

पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय; मध्यरात्री 12 वाजल्यापासून ‘हा’ आदेश लागू

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित
4

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.