
फोटो सौजन्य सोशल मिडिया
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी 17 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रथमतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करावा अशी संकल्पना मांडली होती. ही योजना महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्यानंतर इतर राज्यातही महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर ही योजना सुरू व्हावी यासाठी या योजनेचे मूळ संकल्पक आरोग्यदूत मंगेश चिवटे हे परिश्रम घेत आहेत.
त्यांनी काही महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोवा राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली. आज या संकल्पनेचे प्रत्यक्षात रूपांतर करण्यात आले.
कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यातर्फे गोवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गोवा राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून हा धनादेश देण्यात आला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे. याच यशस्वी कार्यपद्धतीच्या धर्तीवर गोव्यातही स्वतंत्र वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाल्याने आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे मूळ संकल्पक तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्रात रुजलेली गरजू रुग्णांच्या सेवाभावाची संकल्पना आता गोव्यातही साकार झाली असून, या उपक्रमामुळे गोव्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी नवी आशा मिळणार आहे.
Mumbai Mazagon Dock : माझगाव डॉकच्या ३ हजार फिक्स्ड टर्म कामगारांना कायमस्वरूपी रोजगारासाठी प्रयत्न