Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

भूसंपादन आणि स्थानिक विरोधाच्या कचाट्यात सापडलेले रस्ते प्रकल्प आता वेगाने मार्गी लागणार आहेत. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी खेड तालुक्यातील सात महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 04:38 PM
खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अखत्यारितील खेड तालुक्यातील विकासकामांच्या फाईल्स अखेर धुळीतून बाहेर आल्या आहेत. गेल्या काही काळापासून भूसंपादन आणि स्थानिक विरोधाच्या कचाट्यात सापडलेले रस्ते प्रकल्प आता वेगाने मार्गी लागणार आहेत. खुद्द आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवार, ६ जून रोजी खेड तालुक्यातील सात महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली. यावेळी त्यांनी शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींना थेट कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईचा कडक इशारा दिला असून, यामुळे अडवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

चाकण आणि खेड परिसर हा केवळ पुणे जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा एक महत्त्वाचा औद्योगिक कणा मानला जातो. मात्र, येथील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी उतारा शोधण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले होते. परंतु, खराबवाडी, नाणेकरवाडी आणि मेदणकरवाडी या परिसरात स्थानिक वाद आणि भूसंपादनाअभावी या प्रकल्पांचे काम सुरुवातीलाच थंडावले होते.

केवळ कागदी घोडे नकोत, प्रत्यक्ष पाहणी आणि निर्देश

या गंभीर समस्येची दखल घेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी सकाळीच या औद्योगिक क्षेत्राचा सविस्तर दौरा केला. त्यांनी केवळ कागदी अहवालांवर किंवा सादरीकरणावर अवलंबून न राहता स्वतः मैदानावर उतरून देहू–येळवाडी रस्ता, ३० मीटर डीपी रस्ते आणि ४५ मीटरचे महत्त्वाचे आरपी रस्ते यांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामातील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी दूर करून कामाला तात्काळ गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

विकासकामात अडथळा खपवून घेणार नाही!

या दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष चर्चेत राहिली. भूसंपादन किंवा मोजणीच्या प्रक्रियेत अनेकदा स्थानिक पातळीवर होणाऱ्या जाणीवपूर्वक विरोधामुळे सार्वजनिक हिताचे मोठे प्रकल्प रखडतात. यावर बोलताना डॉ. चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत ताकीद दिली की, “जी व्यक्ती, जमीन मालक किंवा घटक शासकीय विकासकामांत सहकार्य करणार नाही किंवा अडथळे निर्माण करेल, त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई केली जाईल.”

हे सुद्धा वाचा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

प्रशासनाचा पुढील कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन):

युद्धपातळीवर काम : प्रलंबित मोजणी आणि विविध विभागांमधील समन्वयातील अडथळे येत्या काही दिवसांत तातडीने दूर करण्याचे आदेश.

नोटीस आणि कारवाई : शासकीय कामात खो घालणाऱ्या घटकांना अधिकृत नोटिसा बजावून कायदेशीर प्रक्रिया गतिमान केली जाईल.

नियमित आढावा : या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीवर आता थेट ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वैयक्तिक नजर असणार आहे.

Web Title: Dr abhijit chaudhary inspected important road projects in khed taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
1

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…
2

सावधान पुणेकर! डेंग्यू-चिकुनगुनियाचा नागरिकांना वेढा; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली, तब्बल १ हजार २६६…

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
4

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.