Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान! बदलत्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत

हवामानातील सतत होणारे बदल, अनियमित पाऊस, दुष्काळाची परिस्थिती, तसेच काही भागांमध्ये होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 12:21 PM
कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान! बदलत्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत

कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान! बदलत्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत

Follow Us
Follow Us:

वळती/सुनिल भोर : भारत हा कृषीप्रधान देश असून, कृषी उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्र आजही लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. देशातील सुमारे ६० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामीण कुटुंबे थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. रोजगाराच्या दृष्टीने पाहिले असता, देशातील एकूण रोजगारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रोजगार कृषी व्यवसाय आणि कृषी संलग्न प्रक्रिया उद्योगातून निर्माण होतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तसेच समाजाच्या जीवनशैलीत शेतकऱ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या तीन दशकांपासून कृषी क्षेत्रासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहत आहेत.

 

हवामानातील सतत होणारे बदल, अनियमित पाऊस, दुष्काळाची परिस्थिती, तसेच काही भागांमध्ये होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे उत्पादन घटते, तर कधी पिके पूर्णपणे नष्ट होतात. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. याशिवाय शेतीमालाच्या विक्रीचा प्रश्न देखील शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनला आहे. अनेकदा बाजारात शेतीमालाला योग्य दर मिळत नाहीत. कांदा, टोमॅटो, भाजीपाला यांसारख्या पिकांचे भाव अचानक घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि संकरित बियाण्यांचा वाढता वापर देखील चिंतेचा विषय ठरत आहे. या गोष्टींमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून उत्पादन खर्च वाढत आहे. परिणामी शेती अधिक खर्चिक होत चालली आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते.

वाढत्या आव्हानामुळे गंभीर स्वरूप धारण

तज्ञांच्या मते, बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासारख्या उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी सरकार, कृषी तज्ञ आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा कृषी क्षेत्रासमोरील ही वाढती आव्हाने भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

हे सुद्धा वाचा : भाजप खासदारासाठी भीमाशंकरचे दरवाजे उघडले; भाविकांचा प्रशासनावर रोष

विकासासाठी प्रत्यक्ष खर्च होणे आवश्यक

कृषी उत्पादकता आणि साठवण क्षमता सुधारण्याचे प्रयत्न करणे, शेतीमालासाठी साठवण केंद्र उभारणे, बदलत्या वातावरणानुसार पीक पद्धतीत बदल घडून आणणे, सहकार्य तत्त्वावर-गट शेती वाढविणे, कृषी घटकांमधील शासकीय-खासगी गुंतवणुकीच्या नवकल्पना राबविणे, स्थानिक पातळीवर अन्न प्रक्रियेतील उद्योगांना चालना देणे आवश्यक झाले आहे. कृषिमूल्य साखळीत शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी संबंधित घटक परिधावर आणावे लागतील. कृषी, संसाधने, सिंचन आणि ग्रामीण जीवनमान विकासावर लक्ष केंद्रित करणारे शासकीय धोरणदेखील अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात शेतीसाठी केलेल्या तरतुदी, नवीन तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण योगदान, गरिबी निवारण्याचे प्रयत्न, शेतीचा पायाभूत विकास यासाठी प्रत्यक्ष खर्च होणे आवश्यक आहे.

Web Title: Farmers are in trouble as new challenges arise in the agricultural sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • agriculture
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
2

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
3

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
4

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.