Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला; माऊलींच्या आगमनापूर्वीच पाण्याचा प्रश्न मिटणार

अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरंदर तालुक्यावर अखेर वरुणराजाची कृपा झाली असून, सर्वत्र जोरदर पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा एकदाचा सुखावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2026 | 05:15 PM
अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Follow Us
Follow Us:

सासवड/ संभाजी महामुनी : अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरंदर तालुक्यावर अखेर वरुणराजाची कृपा झाली असून, सर्वत्र जोरदर पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा एकदाचा सुखावला आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होताच पाळी, पेरणीच्या कामाला वेग येईल असे वातावरण सर्वत्र आहे. तसेच जोरदार पावसामुळे काही दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल.

 

यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना केव्हाच संपला असून, जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला आहे. मात्र पुरंदर तालुक्यातील बहुतेक भाग अद्यापही पावसापासून वंचित असल्याने जोरदार सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. तालुक्यातील सर्व धरणे, विहिरी, ओढे, नाले अद्यापही कोरडेच असून शेतातील कामेही सुरु झालेली नव्हती. तर काही तासांच्या अंतरावर संतांचे पालखी सोहळे सरू होत असल्याने वारीला जायचे कि पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत थांबायचे ? अशा चिंतेत बळीराजा सापडला होता.

पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

८ जून रोजी मृग नक्षत्र सुरु झाले. बेडूक त्याचे वाहन होते, मात्र संपूर्ण नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले, या नक्षत्राचे वाहन गाढव असून २ ते ५ जुलै दरम्यान पाऊस सांगितला होता. त्यानुसार पावसास सुरुवातही झाली. मात्र पडणारा पाऊस दमदार नसून हलक्या प्रमाणात असून तालुक्यातील बहुतेक भाग अजूनही मोठ्या पावसापासून वंचित होता. मात्र नक्षत्र संपायला काही अवधी असतानाच आर्द्रा नक्षत्राने कमाल केली. सर्वत्र जोरदार मुसंडी मारत पाणीच पाणी केले. आठवड्यातील शेवटच्या दोन, तीन दिवस सलग पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान पुरंदरचे कोकण समजले जाणाऱ्या भिवडी आणि काळदरी परिसरात ५९ मिमी ची नोंद झाली असून त्यापाठोपाठ वाल्हे मंडल मध्ये ५४ मिमी इतका पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस पूर्व भागातील कुंभारवळण २२ मिमी आणि राजेवाडी २२ मिमी इतका झाला असून या परिसरात आणखी जोरदार पावसाची गरज आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

पुरंदर तालुक्यातील पावसाची मंडलनिहाय आकडेवारी

सासवड ४३ मिमी, जेजुरी ३५ मिमी, राजेवाडी २२मिमी, वाल्हे ५४ मिमी, कुंभारवळण १२ मिमी, भिवडी ५९ मिमी, परिंचे ४३ मिमी, आणि शिवरी १७ मिमी. याप्रमाणे पाऊस झाला असल्याची माहिती पुरंदर तहसील कार्यालयाचे लिपिक सोमनाथ आव्हाळे यांनी दिली आहे. सोमवारी ६ जुलै रोजी पुनर्वसू ( तरणा पाऊस) नक्षत्र सुरु झाले असून, त्याचे वाहन घोडा आहे. त्यामुळे आता घोडा काय कमाल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Farmers in purandar taluka are happy because of the good rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Farmers
  • Purandar News
  • Saswad

संबंधित बातम्या

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
1

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
2

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
3

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
4

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.