Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याचे माजी महापौर अन् त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीतून नाव गायब; प्रशासनावर गंभीर आरोप

पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे अन् त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीतून नाव गायब असल्याचा गंभीर आरोप धनकवडे यांनी केला आहे. त्यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2026 | 12:49 PM
Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Pune Electoral Roll 2026, Pune Voter List Revision, Form Number 6

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर व नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीतून गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती धनकवडे यांनी दिली आहे. मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान माझ्यासह कुटुंबांचे नाव मतदार यादीतून गायब करण्यात आले आहे. यासंदर्भात गावच्या तलाठ्यापासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला, मात्र बहुतांश ठिकाणी टोलवाटोलवीची उतरे मिळत आहेत” असा गंभीर आरोप दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

धनकवडे म्हणाले, “धनकवडी येथे वास्तव्यास असताना २००२ पूर्वी धनकवडी हा परिसर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत होता. त्यानुसार तेव्हा संबंधित मतदार यादीत माझे व कुटुंबीयांचे नाव होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसआयआर) २००२ पूर्वीच्या मतदार यादीची पडताळणी करताना आमचे नाव संबंधित यादीत नाही, अशी माहिती बीएलओकडून देण्यात आली.”

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल

धनकवडे म्हणाले, ” मी स्वतः १९९७ मध्ये पंचायत समिती हवेलीची निवडणूक लढविली होती. तसेच २००२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या सर्व महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. असे असतानाही २००२ पूर्वीच्या मतदार यादीत माझे व माझ्या कुटुंबीयांचे नाव नसल्यामुळे धक्का बसला. त्याविषयी धनकवडी गावाचे सर्कल, तलाठी आणि बीएलओ यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून ते फक्त उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मतदार यादीतून आमची नावे गायब करण्याचा प्रकार गंभीर असून आता त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार केली आहे.” दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धनकवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा : ऐतिहासिक पुण्याची ‘हेरिटेज सफर’ जोरात! सांस्कृतिक पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती; पण…

राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसाखाली पुणे महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची निवड केली आहे. स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून येत नाहीत, तरीही त्यांना महापालिकेच्या कारभारात निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच अधिकार असतात. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ किंवा अनुभवी राजकीय कार्यकर्त्यांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी ही तरतूद केली जाते.

Web Title: Former pune mayor and his familys names have disappeared from the voter list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Election Commission
  • pune news
  • Voter List

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
1

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
3

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.